शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

66 वनगावे लवकरच होणार महसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहादा-तळोदा तालुक्यांमधील 66 वनगावांचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून, यामुळे ही गावे विकासापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहादा-तळोदा तालुक्यांमधील 66 वनगावांचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून, यामुळे ही गावे विकासापासून वंचित आहेत. त्यांनाही विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तातडीने महसुली दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केली आहे.या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशा आशयाचे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, तळोदा-शहादा तालुक्यामधील मानमोडय़ा, उनपदेव, रायपूर, सबलीपाडा, जुनी पिंप्राणी, बर्डीपाडा (इंदिरानगर), अंधारपाडा, उमराणीपाडा, उकलापाडा, साबलापाणी, नवरपाडा, भूरीमापाडा, आदल्यापाडा, हा:यापाडा, पिपल्यापाडा, गु:हाडपाणी, सरीपाणी, घोटलेपाडा, केरला पाणीपाडा, चिंचोरा, मोदलीपाडा, गु:हाड पाडा, मिठापूरपाडा, रतनपूरपाडा, मेंढय़ावळ, मालपूरपाडा, लिंबर्डी, सातपिंप्री, केवडीपाणी, लहानडोजापाणी, नवलपूर, बर्डीपाडा, मदनपाडा, कोळपांडरी, सावर, सोनबार, गोरांटेबा, कुंडवे, नयामाळ, माळखुर्द, चिरमाळ, कुयरीडाबर, पालाबार, केवलापाणी, मोकस माळ, चिनीपाणी, गढवली, बोरवान, गायमुखी, मोठीबारी, विहिरीमाळ, शिंदवाडापाडा, बेडवाणी, केलापाणी, अक्राणी, टाकली, रावलापाणी, हातबाई, सितापावली, ध्वजापाणी, बिलीचापड, हंडवा कालीबेल, अशी 66 वनगावे आहेत.या गावांमध्ये संपूर्ण आदिवासी कुटुंबे राहतात. प्रत्येक पाडय़ांमध्ये जवळपास 150 पेक्षा अधिक कुटुंबे राहत असतात. मात्र तेथे नागरी सुविधा नसल्यामुळे ही वनगावे विकासापासून वंचित आहेत. स्थानिक महसूल प्रशासनाकडून संबंधीत गावांना महसूल दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन दरबारी प्रस्तावदेखील पाठविण्यात आला आहे. वास्तविक ही आदिवासी कुटुंबे गेल्या 20 ते 25 वर्षापासून तेथे वास्तव्य करीत आहेत. त्यांना मुळ महसुली गावात जागा उपलब्ध न झाल्यामुळे या कुटुंबांनी वनजमिनीवर गाव, पाडे वसविली आहे. वनविभागाच्या दप्तरी वनगावे अशी नोंद असल्यामुळे रस्ते, पाणी, वीज, शिक्षण या सुविधाही उपलब्ध होत नाही. साहजिकच त्यांना विकासाचा निधीही प्राप्त होत नाही. त्यामुळे या वनगावांना विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी तातडीने वनगावांचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.