शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात 57 तर नंदुरबारात 69 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता़ यांतर्गत रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ सर्वाधिक चुरशीच्या अक्कलकुवा ग्रामपंचायत  लोकनियुक्त सरपंच पदासाठी 57़88 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 69 टक्के मतदान झाल़े    अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमाती महिला राखीव लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या 10 दिवसांपासून प्रचार सुरु होता़ रविवारी सकाळपासून शहरातील 14 प्रभागात 14 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली़ काहीशी संथ सुरुवात झाल्यानंतर दुपारी मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावल्याने 66 टक्के मतदान झाल़े याठिकाणी भाजप पुरस्कृत माजी सरपंच उषाबाई बोहरा, काँग्रेस पुरस्कृत सुशिलाबाई गेमू वळवी आणि एमआएम पुरस्कृत उमेदवार राजेश्वरी इंद्रवदन वळवी अशी तिरंगी लढत रंगली होती़ 10 दिवसांपासून उमेदवारांचा प्रचार रंगला होता़ अक्कलकुवा शहरात जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, दोन आणि तीन या ठिकाणी 10, मक्राणीफळी भागात 3 तर मिठय़ाफळी भागात 1 अशा 14 बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली़ 14 मतदान केंद्रांवर 70 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली होती़  केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष 3 मतदान अधिकारी, एक शिपाई, अशा पथकांची नियुक्ती होती़ पोलीस दलातर्फे पोलीस उपनिरीक्षक, 10  ब्लॅक कमांडो,8 पुरुष आणि 2 महिला पोलीस कर्मचा:यांचे फिरते पथक तयार करण्यात आले होत़े सायंकाळर्पयत शहरात मतदानाला कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही़सोमवारी सकाळी 10 वाजेनंतर अक्कलकुवा आणि नंदुरबार येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आह़े यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आह़े 

4अक्कलकुवा येथे प्रभाग क्रमांक एक-369, प्रभाग दोन-362, प्रभाग चार-329, प्रभाग चार-459, प्रभाग पाच-417, प्रभाग सहा-288, प्रभाग सात-481, प्रभाग आठ-437, प्रभाग नऊ-443, प्रभाग दहा -496, प्रभाग 11-521, प्रभाग 12- 445, प्रभाग 13-307 तर प्रभाग 14 मध्ये 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण 10 हजार 151 पैकी 5 हजार 876 जणांनी मतदान केल़े यात 3 हजार 262 पुरुष तर 2 हजार 613 स्त्री मतदारांचा समावेश आह़े4नंदुरबार तालुक्यातील वेळावद ग्रामपंचातीच्या एका जागेसाठी 81़05 टक्के मतदान झाल़े 153 स्त्री आणि 138 पुरुष अशा 291 जणांनी मतदान केल़े उमर्दे खुर्द येथील एकाच प्रभागातील दोन जागांसाठी 62़62 टक्के मतदान झाल़े 205 स्त्री आणि 206 पुरुष अशा 411, नळवे खुर्द येथे एका जागेसाठी 57़74 टक्के मतदान झाल़े 125 स्त्री व 127 पुरुष अशा 252 तर पावला येथे एका जागेसाठी 83 टक्के मतदान झाल़े 195 स्त्री आणि 181 पुरुष अशा 376 मतदारांनी मतदान केल़े