शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

50 हजाराची लाच मागणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त कर्मचा:याचे वेतनवाढ व फरकाचे बिल काढण्यासाठी त्याच कार्यालयातील महिलेसह पुरुष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त कर्मचा:याचे वेतनवाढ व फरकाचे बिल काढण्यासाठी त्याच कार्यालयातील महिलेसह पुरुष कर्मचा:याने प्रत्येकी 25 हजार रुपयांची मागणी केली होती़ सेवानिवृत्ताच्या तक्रारीनंतर दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली़ आदिवासी विकास महामंडळातून डिसेंबर 2018 मध्ये कनिष्ठ सहायक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीकडून नंदुरबार शहरातील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयातील लेखापाल संतोष बहादूर आमटे व उपप्रादेशिक व्यवस्थापक किरण बाळू गाढे या महिला अधिकारीने  प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ सुधारित सेवा प्रगती योजनेंतर्गत सेवानिवृत्ताची वेतनवाढ व फरकासह 11 लाख 42 हजार 805 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी दोघांनी ही लाच मागितली होती़ लेखापाल आमटे याने धनादेश तर उपप्रादेशिक व्यवस्थापक किरण गाढे हिने रोख स्वरुपात पैश्यांची मागणी केली होती़ या संदर्भात सेवानिवृत्ताने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव यांच्याकडे तक्रार केली होती़ त्यानुसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली़ उपअधिक्षक शिरीष जाधव व पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचा:यांनी ही कारवाई केली़