शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार पैकी ४५ उमेदवारी अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत  दोन हजार ५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत  दोन हजार ५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ४५ अर्ज छाननी अंती बाद ठरवण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात करण्यात आलेल्या छाननीअंती ही आकडेवारी समोर आली आहे.  बुधवारी अंतिम मुदतीत शहादा तालुक्यातील  २७ ग्रामपंचायतींसाठी ६६२,  धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ४२६, अक्कलकुवा  तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ३५, तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी १८२, नंदुरबार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी  ४७३,  नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींसाठी  २८० असे एकूण २ हजार ५६  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून करण्यात आली. छाननीत तळोदा येथे १ अर्ज अवैध ठरल्याने १८१ अर्ज वैध झाले. अक्कलकुवा येथे २९ अर्ज वैध तर सहा अर्ज अवैध झाले. शहादा येथे १४ अर्ज अवैध ठरुन ६४८ अर्ज वैध ठरले. नंदुरबार येथे ४७३ पैकी १४ अर्ज अवैध ठरल्याने ४५९ अर्ज वैध ठरले. धडगाव येथे ८ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले. यातून ४०८ अर्ज वैध ठरले. नवापूर येथे २ अर्ज अवैध ठरले तर २८० अर्ज वैध ठरवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आकडेवारी जुळवा होत असल्याने निश्चित आकडा समाेर येण्यास उशिर झाला. दरम्यान शुक्रवारपासून माघाराची मुदत सुरु झाली आहे. ४ जानेवारीपर्यंत ही मुदत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप व प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या एकूण २८३ प्रभागांच्या ६७५ सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १ लाख ४६ हजार ५५६ मतदार मतदान करणार आहेत. मतदानाच्या तयारीला प्रशासन लागले असल्याची माहिती आहे. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याची चर्चा आहे. तिलाली व शनिमांडळ येथे जेवढ्या जागा तेवढेच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

शहाद्यात तीन ग्रा.प बिनविरोध शहादा तालुक्यातील वर्ढे त. श, हिंगणी व न्यू असलोद या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने बिनविरोध आहेत.