शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

39 किलोमीटर अंतरात 13 ठिकाणी रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अक्कलकुवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान असलेल्या  घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळून रस्ता बंद झाला आहे. सहा ठिकाणी लहान-मोठे पूल वाहून गेले तर सात ठिकाणी रस्त्यावर मोठय़ा दरडी कोसळल्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील घाटाच्या तीन किलोमीटरच्या आत जास्त पूल तुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माळीआंबाच्याखाली तीन किलोमीटर्पयतच्या मार्गावर माती असल्याने रस्ता बंद झाला आहे. देवगोईहून माळीआंबार्पयत वाहन पोहोचू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी मशीन पाठवून रस्ता साफ करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. डाबच्या माळीआंबापाडा येथे संततधार पावसामुळे पाच घरे क्षतिग्रस्त झाल्याने नुकसान झाले तर एक घोडाही वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही पूर्णपणे खंडित झाला आहे. कोयलीविहीर, कंकाळमाळ ते वाडीखालीपाडा खाई व  कोरजाबारी ते खाई  हे दुर्गम भागातील रस्तेही बंद झाले आहेत. मोलगी येथून अक्कलकुवा येथे येण्यासाठी अनेक प्रवासी घाटार्पयत वाहनाने येतात व मधील तीन किलोमीटर्पयत पायी प्रवास करून अलिकडील वाहनातून अक्कलकुवा गाठण्याची कसरत करतात. सध्या पाऊस बंद असल्यामुळे मातीचे ढिगारे सरकवण्याचे काम सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुणाल पटले यांनी सांगितले. मात्र या कामाला गती देण्याची गरज आहे.