शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

33 बालकांच्या चेह:यावर ‘मुस्कान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 17:34 IST

नंदुरबार पोलिसांनी घेतला हरविलेले, बालकामगार तसेच अपहरण झालेल्या बालकाचा शोध

ठळक मुद्देस्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने 14 अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़ेजिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणा:या मुलांची चौकशी केली होती़ शोध कार्यात 17 अल्पवयीन मुले-मुली भिक मागताना, बालकामगार म्हणून काम करताना आढळून आल्याने त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आह़े

ऑनलाईन लोकमत नंदुरबार, दि.3 - जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े यांतर्गत 2017 मध्ये जिल्ह्यात तब्बल 33 बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आह़े पोलीस दलाकडून 2014 पासून घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़े याअंतर्गत गेल्या तीन वर्षात पोलीस दलाकडून जिल्ह्यातील अनेक बालकांना मुख्य प्रवाहात आणले. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या या अभियानात पथकांनी जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणा:या मुलांची चौकशी केली होती़ यातून आठ मुले आणि आठ मुली ह्या पळवून आणलेल्या असल्याचे लक्षात असल्यानंतर त्यांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आल़े मुस्कानअंतर्गत नंदुरबार शहर, नवापूर, शहादा, तळोदा व अक्कलकुवा या शहरांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पथक व जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बालविकासचे अधिकारी यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घेतलेल्या शोध कार्यात 17 अल्पवयीन मुले-मुली भिक मागताना, बालकामगार म्हणून काम करताना आढळून आल्याने त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आह़े स्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने 14 अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले होत़े पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक विजयसिंग परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पी़बी़देवरे, संरक्षण अधिकारी मिनाक्षी कोळी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ईश्वर धामणे यांनी काम पाहिल़े पालकांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न पोलीस दल ‘मुस्कान’च्या माध्यमातून करत आह़े हे एक सामाजिक कार्य आह़े यापुढेही जिल्ह्यातून हरवलेल्या आणि बालकामगार म्हणून काम करणा:यांची सुटका करण्यावर भर राहील़ -राजेंद्र डहाळे, पोलीस अधीक्षक, नंदुरबाऱ