शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातर्फे ३०३ कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागातर्फे ३०३ कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एक कोटी रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागातर्फे ३०३ कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एक कोटी रुपयांची ही कामे आहेत.याचाच एक भाग म्हणून जुनमोहिदे, ता.नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते कंम्पार्टमेंट बंडींगच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यात गट क्रमांक एक मध्ये ४४ मजूर, गट क्रमांक तीन मध्ये ५२ मजूर व गट क्रमांक चार मध्ये २९ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली. या वेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते, कृषी सहाय्यक अरूण पाटील, सुधीर वाघमारे, सरपंच राजेंद्र पाटील, ग्रामसेवक ललिता गवते आदी उपस्थित होते.कृषी विभागामार्फत विविध गावात सुमारे एक कोटी पाच लाख रूपयांची ३०३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, २६ कामे सुरू आहेत. यामध्ये फळबाग लागवड, गांडुळ युनिट, नॅडेप युनिट, कम्पार्टमेंट बडींग या कामाचा समावेश आहे. या कामातून सुमारे ४४ हजार २६० मनुष्य दिवस एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. फळबाग लागवड या नियमित योजनेमध्ये जून-जुलै पर्यंत रोजगार निर्मित करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावांमध्ये रोजगाराची आवश्यकता अशा गावात ग्रामपंचायतीमध्ये अथवा रोजगार सेवकांकडे मागणी नोंदविल्यास तत्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मग्रारोहयो अंतर्गत मजुरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मजुरांना केले आहे.नंदुरबार येथील कृषी विभागातील कृषी सहाय्यक अरूण पाटील हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असतांनाही त्यांनी सुमारे १२५ मजुरांना महिनाभर पुरेल अशा कामांचे नियोजन केले असून, महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी गावात जनजागृती त्यांनी केली आहे.