शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन वर्षात 2700 बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:38 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील इतर भागाच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण घटत असले तरी गेल्या तीन वर्षात दोन हजार 700 बालकांचा मृत्यू झाला आहे.             दरम्यान  प्रशासनाकडे बहुतांश बालमृत्यूची नोंदच नसल्याने हा आकडा कागदावरच कमी होत असल्याचा कयास लावला जात  आहे.सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या 30 वर्षापासून सातत्याने गाजत आहे. त्यातूनच आकडेवारीचा घोळ, नावालाच राबविण्यात आलेल्या योजना, शिक्षण, आरोग्यातील अनियमितता याबाबतचे वेगवेगळे किस्से समोर आले आहे. अनेक बाबीत सुधारणा झाल्या, काही नवीन प्रयोग राबविण्यात आले. पण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर काही काळ त्याची चर्चा होते. पुन्हा जैसे थे चित्र असते. त्याबाबतचे सातत्य व यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने कुपोषणाचे प्रमाण प्रत्यक्षात कमी होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास आकडेवारीत घट होत असली तरी आहे ते प्रमाणदेखील चिंताजनक आहे. 2016-17 मध्ये एकूण 970 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 0 ते एक वयोगटातील 773 बालक मृत्यूमुखी पडले. यात ग्रामीण भागातील 400 ते शहरी व संस्थात्मक भागात 337 बालकांचा मृत्यू झाला. तर एक ते सहा वर्ष वयोगटातील 233 बालकांचा मृत्यू झाला. यातही ग्रामीण भागातील 191 बालकांचा मृत्यू झाला. 2017-18 मध्ये एकूण 883 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक वयोगटातील 740 तर एक ते सहा वयोगटातील 143 बालकांचा समावेश    आहे. यात एकूण ग्रामीण भागातील 479 तर शहरी भागातील 404 बालकांचा मृत्यू झाला.2018-19 मध्ये एकूण 844 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक गटातील 708 व एक ते सहा वयोगटातील 136 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातही ग्रामीण  भागातील 426 तर शहरी भागातील 418 बालकांचा मृत्यू झाला आहे.एकूणच या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास त्यात सातपुडय़ातील अर्थात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्रमाण अधिक आहे. या दोन्ही तालुक्यात 2016-17 मध्ये 970 पैकी 320 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 2017-18 मध्ये 883 पैकी 278 आणि 2018-19 मध्ये 844 पैकी 277 बालकांचा मृत्यू धडगाव  आणि अक्कलकुवा तालुक्यात झाले   आहे. यातही  शून्य ते एक वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे.