शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर पोलीस दल ठेवणार 24 तास लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दल प्रयत्नशील आह़े सलोखा अबाधित रहावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दल प्रयत्नशील आह़े सलोखा अबाधित रहावा यासाठी पोलीस दलाकडून सोशल मिडियावर 24 तास लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली़  अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे होत़े   यावेळी पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,  उपनगराध्यक्ष परवेज खान, उपविभागीय पोलीस अधिकारी  रमेश पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, शिवसेनेचे दिपक गवते, संतोष पाटील, मोहन माळी, माणिक माळी, रेव्हरंड अनुप वळवी, आरिफ पठाण यांच्यासह नंदुरबार शहरातील विविध मान्यवर व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होत़े बैठकीत येत्या आठ जुलै रोजी धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी मंचतर्फे  देशात घडणा:या मॉब लिचिंगच्या घटनांचा विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता़ हा मोर्चा मंचतर्फे स्थगित करण्यात यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी बैठकीत केल़े पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले की, पोलीस दलाकडून सर्वच शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था योग्यरितीने हाताळली जात आह़े अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच गुन्हेगारांवर वॉच ठेवला जावा म्हणून सीसीटीव्हीसाठी लागणा:या निधीची मागणी केली आह़े यांतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही त्रुटी राहिल्या आहेत़ त्या लवकरच दूर होऊन जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ शांतता कमिटीच्या बैठकीत आलेल्या काही सदस्यांनी 2 जुलै रोजी झालेल्या मूकमोर्चात सहभागी नसतानाही पोलीस दलाने नोटीसा बजावल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली होती़ त्यावर पोलीस दलातर्फे स्पष्टीकरण देताना अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी बजावलेल्या नोटीसा केवळ दक्षता म्हणून दिल्या गेल्या असून त्याद्वारे सतर्कता बाळगण्याचे सूचित करण्यात आले असल्याचे सांगत सदस्यांचे समाधान केल़े  प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भारिपचे  अरुण रामराजे यांच्यासह समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त करत शहरातील सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली़ आभार उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी मानल़े जिल्हाधिकारी मंजुळे यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना सीसीटीव्ही कॅमे:यांसाठी जिल्हा नियोजन किंवा सीएसआर फंडातून निधी देण्याची तरतूद करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून सर्व नगरपालिकांच्या निधीचाही वापर करणार असल्याची माहिती दिली़ गंभीर गुन्ह्यातील गुंडांना तडीपार करण्यासंबधी येत्या काळात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितल़े दरम्यान पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आठ जुलै रोजी धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला स्थगिती देत त्याऐवजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मंचच्या पदाधिका:यांनी दिल़े याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना बैठक संपल्यानंतर दिल़े निवेदनानुसार मोर्चाऐवजी मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आह़े