शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीएम आवास योजनेच्या लाभाअभावी २३ हजार लाभार्थींचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण, ...

नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण, १६ हजार ७२७ लाभार्थींची नोंदणी होऊन ११ हजार ६४७ जणांची घरे पूर्ण झाली होती. या वर्षात केवळ ९८७ घरे अपूर्ण होती. २०१७-१८ या वर्षातही १५ हजार ६०१ घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट होते. १४ हजार २८० घरे या वर्षात पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ३२१ घरे अपूर्ण होती. २०१८ - १९ या वर्षात १० हजार ३४७पैकी ८ हजार ८८० घरे पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ५०७ घरे अपूर्ण होती. एकीकडे तीन वर्षात घरांचे उद्दिष्ट अधिक प्रगतपणे पूर्ण करण्यात आल्याने २०१९ - २० या वर्षात ५० हजार ८२० उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातून ३० हजार ८५८ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असले तरी अद्याप १९ हजार ९६२ घरांची कामे अपूर्ण आहेत. चार वर्षांच्या काळात २३ हजार ७७७ घरे अपूर्ण राहिल्याने त्याचा फटका थेट लाभार्थींना बसला आहे.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून थकीत रक्कम असलेल्या लाभार्थींना त्यांचा लाभ देण्याची तरतूद करत आहे. दोन दिवसात अक्कलकुवा येथील लाभार्थींना रक्कम प्रदान केली आहे. पुढे इतर तालुक्यातील रक्कम अदा करण्याचे काम होईल. टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थींना त्यांच्या रकमा देण्यावर भर देत आहे. प्रशासकीय कामकाजालाही गती दिली जात आहे. येत्या काळात सर्व लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल.

-पी. एस. लाटे, प्रभारी प्रकल्प संचालक, डीआरडीए, नंदुरबार.

स्वत:च केली तात्पुरती सुविधा

२०१९ - २० या वर्षात अक्कलकुवा तालुक्यात ४ हजार, धडगाव ३ हजार ८६२, नवापूर ४ हजार, शहादा ४ हजार, तर तळोदा तालुक्यात अडीच हजार घरकुले अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी या लाभार्थींना अनुदान न मिळाल्यास त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. अनेकांनी घरावर ताडपत्री टाकण्यासह जुजबी पत्रे ठेवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

प्रशासनाकडून तिसऱ्या टप्प्यातील निधी नुकताच प्राप्त झाला आहे. यामुळे पुढील कामाला सुरुवात केली आहे. परंतु शेवटच्या टप्प्यातील निधी मिळण्यास उशीर झाल्यास पुन्हा अडचणींचा सामना करावा लागेल.

- उदेसिंग आमशा पाडवी,

लाभार्थी, रांझणी, ता. तळोदा.