शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षानंतर आले ‘नाला’ प्रकल्पात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  न्याहली : नंदुरबार तालुक्यातील अवर्षणग्रस्त अशा पूर्व भागातील शेतक:यांच्या शेतांचे सिंचन होऊन जलसंधारण व्हावे यासाठी 2001 ...

लोकमत न्यूज नेटवर्क न्याहली : नंदुरबार तालुक्यातील अवर्षणग्रस्त अशा पूर्व भागातील शेतक:यांच्या शेतांचे सिंचन होऊन जलसंधारण व्हावे यासाठी 2001 सालापासून उभारण्यात आलेल्या अमरावती नाला प्रकल्पात 13 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर पाणीसाठा झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदलहर दौडू लागली आह़े तूर्तास प्रकल्पात 15 टक्के पाणीसाठा झाला असून पाण्याअभावी कोरडय़ाठाक असलेल्या या प्रकल्पात उगवलेली काटेरी झुडपे पाण्याखाली जात असल्याचे अनोखे दृश्य येथे नजरेस पडत आह़े पूर्व भागातील बलदाणे, न्याहली, आसाणे, खोक्राळे यासह विविध गावांमध्ये सिंचन व्हावे याउद्देशाने अमरावती नाला प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती़ निर्मितीनंतर 2004 ते 2006 या काळात या प्रकल्पात 2़90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता़ कालांतराने पावसाने या भागात हजेरी न लावल्याने हा साठा कमी होत जाऊन 2011 उजाडेर्पयत प्रकल्पपूर्णपणे कोरडा ठाक पडला होता़ पावसाळ्यात तळे साचत असल्याचे दिसून येत होत़े यातून जलसंधारणाचा मुख्य उद्देश अपूर्ण राहिला होता़ विविध प्रयत्न करुन हा प्रकल्प भरण्याचा प्रयोग राबवला गेला़ परंतू प्रकल्पात साठाच होत नव्हता़ सध्या सुरु असलेल्या तापी-बुराई उपसा सिंचन योजनेत हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असे सांगण्यात आल्यानंतर न्याहली व बलदाणे येथील शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत होता़ परंतू उपसा सिंचन योजनेचे काम संथगतीने सुरु असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार कधी असा प्रश्न होता़ दरम्यान पावसाळा सुरु झाल्यानंतर अमरावती नदीला पाणी येऊन शनिमांडळ येथील तलाव आणि बंधारा भरले गेल्यानंतर पुराचे पाणी येथे आल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होण्यास प्रारंभ होत आह़े या पाण्यामुळे लगतच्या तीन गावांचा पिण्याचा प्रश्न येत्या वर्षभरापुरता निकाली लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली आह़े पावसाने साथ दिल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े गत 15 दिवसांपासून पूर्व भागातील गावांमध्ये पावसाची स्थिती चांगली असल्याने शेतक:यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आह़े प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास या रब्बी हंगामही चांगला जाणार आह़े