शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

12 लाख शिधापत्रिकांना प्राधान्य कुटूंब योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटूंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटूंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. नागरिकांनी गॅस जोडणीसाठी विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.योजनेअंतर्गत पात्र कार्डधारकांना केवळ 100 रुपये भरुन गॅस जोडणी मिळणार असून उर्वरित खर्च शासन करणार आहे. अंत्योदय योजनेचा इष्टांक एक लाख सहा हजार 698 कार्ड व प्राधान्य योजनेसाठी सात लाख 36 हजार 69 युनिट असे एकूण 12 लाख 65 हजार 760 पात्र व्यक्तींना अन्नधान्य लाभ देण्यात येत आहे. इष्टांक पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44 हजार व शहरी भागात 59 हजार उत्पन्न असलेल्या व सध्या धान्य मिळत नसलेल्या एनपीएच योजनेतील केशरी कार्ड धारकांकडून हमीपत्र भरुन घेण्याचे तसेच प्राधान्य योजनेत आलेले हमीपत्र तपासुन पात्र कार्ड धारकांना समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या कुटुंबांकडे अंत्योदय व प्राधान्य योजनेची शिधापत्रिका आहे परंतु गॅस कनेक्शन नाही अशा उज्वला योजनेसाठी पात्र असणा:या कार्डधारकांकडून विस्तारीत उज्वला योजनेचे अर्ज स्वस्त धान्य दुकानदार यांचेमार्फत भरुन घेण्यात येत आहेत. तपासणीनंतर पात्र असणा:या कार्ड धारकांना गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत आहे. जे कार्डधारक रॉकेलचे हमीपत्र भरुन दिलेले असल्याने रॉकेल घेत आहेत त्या कार्डधारकांनी प्राधान्याने विस्तारीत उज्वला योजनेचे फॉर्म भरुन घ्यावेत. त्या कार्डधारकांना सप्टेंबर 2019 पासून रॉकेलचे वितरण केले जाणार नाही याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त कार्डधारकांनी लाभ घेऊन गॅस कनेक्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.