शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील १० हजार रुग्णांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून आढळून येणा-या कोरोना बाधित रुग्णांसाठी १०८ रूग्णवाहिका महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. बाधिताच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून आढळून येणा-या कोरोना बाधित रुग्णांसाठी १०८ रूग्णवाहिका महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. बाधिताच्या घरापासून थेट कोविड सेंटरपर्यंत आणून सोडत त्यांचे जीव वाचवणा-या या रुग्णावाहिकांना चालवणारे चालक, वाहक, डाॅक्टर्स यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.                जिल्ह्यात ठेका पद्धतीने १०८ च्या रुग्णवाहिका सुरू आहेत. यासाठी ३६ चालक व डाॅक्टर्स नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गंभीर कोरोनाबाधित रुग्ण किंवा अपघाती रुग्णाला तातडीने दाखल करण्यासाठी वाहतूक केली होती. दर दिवशी जिल्ह्यासह परजिल्ह्यात रुग्ण वाहून नेणा-या या रुग्णवाहिका सुमारे दीड हजार किलोमीटरचे अंतर पार करत आहेत. जिल्ह्यात काम करणा-या   रुग्णवाहिकेवरील कर्मचा-यांच्या काही मागण्या असून यात प्रामुख्याने धडगाव, नवापूर, मोलगी, धडगाव याठिकाणी निवास करण्यासाठी क्वार्टर्स नसल्याने अडचणी वाढत आहेत. या सुविधा दिल्यास अनेक अडचणी दूर होणार आहेत. 

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था हवी*खाजगी कंपनीकडून चालवण्यात येणा-या चालक वाहकांना नियमित वेतन देण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे. काही ठिकाणी निवासस्थाने देण्याची मागणी आहे.  *नियुक्त करण्यात येणारे डाॅक्टर्सही रुग्णवाहिकांवर काम करत असल्याने त्यांना शासकीय निवासस्थानात जागा देण्याची मागणी आहे. 

१०८ रुग्ण  वाहिका  १४

चालक वाहकांची संख्या ३६

कोरोना काळात सहा हजार रुग्णांची केली वाहतूक एप्रिल ते नोव्हेंबर या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून १०८ रुग्णवाहिकांचा वापर सुरू आहे. बाधित रुग्णांसोबतच गंभीर रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देत ही वाहतूक केली गेली हे विशेष. गंभीर रुग्णांसाठी याठिकाणी डाॅक्टर्स उपलब्ध करुन देण्यात आले होते. जिल्ह्याबाहेर जाणा-यांनाही हे वाहन दिले गेले. 

अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणनवापूर ते कोंडाईबारी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग, शेवाळी नेत्रंग महामार्गसह दुर्गम भागात होणा-या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जिल्हा मुख्यालयापर्यंत आणण्याचे काम १०८ रुग्णवाहिकांनी केले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात २ हजार पेक्षा अधिक अपघातग्रस्तांना मदत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तैनात आहेत. चालक व वाहक सातत्याने कामावर आहेत. बाधित रुग्णाला पूर्ण दक्षता घेत रुग्णालयापर्यंत आणून सोडत पुन्हा दुस-या रुग्णांना घेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका धावत राहिल्या आहेत. -निलेश पाटील, व्यवस्थापक, बीव्हीजी.