शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरती पूजनात 10 हजार भाविकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : साक्री व चौपाळा येथील भाविकांनी चौपाळ्यापासून पायी दिंडी काढून मोरवड येथे सोमवारी रात्री गुलाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : साक्री व चौपाळा येथील भाविकांनी चौपाळ्यापासून पायी दिंडी काढून मोरवड येथे सोमवारी रात्री गुलाम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरती पूजन केले. यानंतर दिंडीचे विसजर्न करण्यात आले. या वेळी साधारण 10 हजार भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. त्यामुळे याठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.गेल्या 50 ते 60 वर्षापासून दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गुलाम बाबांचे अनुयायी नंदुरबार तालुक्यातील चौपाळ्यापासून पायी दिंडीने मोरवड येथे येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेत असतात. यंदाही सोमवारी या दिंडीने पायी येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘आप की जय’च्या जयघोषाबरोबरच भजन, रामधूनमुळे मोरवड परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.या दिंडीची सुरूवात चौपाळे, ता.नंदुरबार येथून सकाळी सात वाजेपासून करण्यात आली. चौपाळा येथेच साक्री तालुक्यातील दिंडीही सहभागी झाली होती. तेथून या दोन्ही दिंडय़ा एकत्रितपणे नंदुरबार मार्गे आली. या वेळी नंदुरबार येथील आमदार कार्यालयाजवळ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिंडीचे स्वागत केले. यानंतर सज्जीपूर मार्गे वाकाचार रस्ता, हातोडा, तळोदा, आमलाड व मोरवड येथे रात्री बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.या वेळी समाधी स्थळी आरती पूजन करण्यात आले. यानंतर दिंडीचे विसजर्न करण्यात आले. दरम्यान हातोडा पुलाजवळ ही दिंडी आल्यानंतर माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, आमदार विजयकुमार गावीत, आमदार के.सी. पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी दिंडीचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी दिंडीचे पूजन केले.रूपसिंग पाडवी, यशवंत पाडवी, हिरामण पाडवी उपस्थित होते. फुलांनी सजविलेल्या रथात गुलाम बाबांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. गावात ठिकठिकाणी सुवासिनींनी दिंडीचे आरती पूजन केले. मोरवड येथे बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या मठात भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. मठपती जितेंद्र पाडवी हे चौपाळ्यापासूनच दिंडीत सहभागी झाले होते. यंदा प्रथमच साक्री तालुक्यातील दिंडी चौपाळा येथे सहभागी होऊन एकत्र आल्यामुळे या दोन्ही दिंडय़ांनी तळोदेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे शहराची बाजारपेठदेखील फुलली होती.