शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ...

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली आहे.

सन २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण कुसुम सभागृहात समारंभपूर्वक होणार आहे.

नांदेड जिल्हा परिषद ही विकासात्मक कामाशिवाय सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अत्युच्च योगदान असणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्काराने सन्मानित करत असते. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने दिला जाणारा सन २०१९चा सावित्रीबाई फुले पुरस्कार बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या बारगजे यांना, तर सन २०२०चा सावित्रीबाई फुले पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या बेबी सुरेखा शिंदे रावणगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

तसेच २०१९ या वर्षाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक, कवी डॉ.सुरेश सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे, तर सन-२०२०चा कै.नरहर कुरुंदकर पुरस्कार कवयित्री लेखिका आशा पैठणे यांना जाहीर झाला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, खा.सुधाकर शृंगारे, महापौर मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, आ.विक्रम काळे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.सतीश चव्हाण, आ.राम पाटील रातोळीकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, आ.भीमराव केराम, आ.डॉ.तुषार राठोड, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, जि.प. उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार, शिक्षण सभापती संजय माधवराव बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाजकल्याण सभापती अ‍ॅड.रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची उपस्थिती राहणार आहे.