शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद चकाचक

By admin | Updated: November 5, 2014 13:28 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

 नांदेड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, कक्षाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे साचलेली धूळ या मोहिमेत दूर केल्यानंतर जिल्हा परिषद अगदी चकाचक झाली होती.

स्वच्छतेचे महत्व ग्रामीण भागात पटवून देत असताना ज्या कार्यालयात आपण काम करतो ती कार्यालय स्वच्छ आणि प्रसन्न असावीत या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी ही मोहीम राबविली. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच जिल्हा परिषदेतल्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी हाती झाडू घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी आपल्या कक्षातील धूळ स्वत:च दूर केली. 
इतकेच नव्हे, तर जि.प. तरंगलेले कोपरेही त्यांनी स्वच्छ केले. त्यांच्यासह सर्वच खातेप्रमुखांनी आपल्या विभागात साचलेली धूळ स्वच्छ करताना जुन्या संचिका, कचरा दूर केला. इतकेच नव्हे तर सर्व शिक्षा अभियान विभागातील कर्मचार्‍यांनी आपले कार्यालय चक्क धुवूनच काढले. मोहर्रमची सुटी असतानाही अधिकारी कर्मचार्‍यांनी स्वच्छतेप्रती दाखविलेला उत्साह निश्‍चितच कौतुकास्पद ठरला आहे. या मोहिमेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे, कार्यकारी अभियंता एस. पी. पैलवाड, एन. एम. नलावडे यांच्यासह सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वित्त विभाग, पंचायत विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. मोठय़ा प्रमाणात कार्यालयातच साचलेली धूळ विभागप्रमुखांसह सर्वांच्याच डोळ्याआड राहत होती. मात्र या मोहिमेमुळे मोठय़ा प्रमाणात ती दूर झाली. जिल्हा परिषद परिसरातही स्वच्छता करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे. 
स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात काम करण्यासाठी दर मंगळवारी श्रमदानातून जि. प. च्या सर्व कार्यालयात आणि परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरही दर मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे काळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे आता पंचायत समितीस्तरावरही हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे.