शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

किनवट : जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीचा पाऊस व सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित ...

किनवट : जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीचा पाऊस व सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दिवाळीला दिले जाणारी मदत तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या किनवट किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या १७ गावांना होळी शिमग्यालाही मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. नुकसानीची मदत मिळवण्यासाठी इंग्रजी किंवा मराठी आद्यअक्षरापासून अ पासून सुरू होणाऱ्या पाच गावांना पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजे मे व जून महिन्यात अनुदान मिळेल असे लावण्यात आलेल्या वेळापत्रकात दिसून येत आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीच्या पावसाने व सततच्या पावसाने खरीप हंगामातील शेती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान रक्कम जाहीर झाली. त्याचा पन्नास टक्के निधीची रक्कम नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावर जमा झाला. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या पन्नास गावाच्या १५ हजार ४७९ शेतकऱ्यांचे ६ कोटी ४८ लाख ५४ हजार रुपये जमा झाले. २३ नोव्हेंबर पासून मराठी किंवा इंग्रजी अध्यक्षरापासून वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार किनवट यांनी संबंधित बँकेला देऊनही बँकेने या आदेशाला बगल देऊन झेड अक्षरापासून वाटप सुरू केले आहे. आजपर्यंत केवळ नऊ गावच्या बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. आजही ४१ गावचे शेतकरी अनऊदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात व्हावी म्हणून दिवाळीच्या काळात अनुदान बँकेच्या खात्यावर जमा होऊनही याद्यांचा घोळ असल्याने विलंबाने वाटप सुरू झाले दिवाळी गेली १७ गावच्या ५ हजार ५२६ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख १९ हजार रुपयांचे होळी, शिमग्यालाही वाटप होणार नसल्याचे दिसून येत आहे. तर अंबाडी, अंबाडीतांडा, आंदबोरी, आमडी, आंजी या पाच गावच्या १ हजार ७१३ शेतकऱ्यांना ७४ लाख २० हजार रुपये आतापासूनच पाच महिन्यानंतर मिळणार आहे. पाच पाच महिने अनुदान वाटपाला लागत असेल तर अनुदान जाहीर करून उपयोग काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या याद्यासह नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे १३ नोव्हेंबर २०२० रोजी वर्ग केले मात्र वाटप होण्याचा पत्ताच नाही. अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना लागत असलेला विलंब पहाता अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.