शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून जलजागृती सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्व ...

दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्व काळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता, आदींबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर दि. २२ मार्च ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.

या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन प्रारंभ करणे, २३ मार्च रोजी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करून समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्रोतांच्या उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धिकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल, तर २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्रोत दुरुस्त करणे, आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

दरम्यान, हे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.