शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

वॉर्ड रचनेमुळे इच्छुक उमेदवार सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्या निवडणुका या एक सदस्यीय वॉर्ड रचनेनुसारच झाल्या हाेत्या. त्यानंतर प्रभाग पद्धती २००२च्या निवडणुकीत सुरू झाली. दाेन ...

महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्या निवडणुका या एक सदस्यीय वॉर्ड रचनेनुसारच झाल्या हाेत्या. त्यानंतर प्रभाग पद्धती २००२च्या निवडणुकीत सुरू झाली. दाेन सदस्यांचा एक प्रभाग स्थापन करण्यात आला हाेता. पुन्हा २००७ मध्ये एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने ७९ वॉर्डात निवडणुका झाल्या. २०१२ मध्ये दाेन सदस्यीय आणि पुन्हा २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. प्रभाग पद्धतीचा फायदा पक्षांना झाला. त्याच वेळी चांगले उमेदवार या पद्धतीमुळे बाजूलाही फेकले गेले.

राज्य शासनाने २५ ऑगस्ट राेजी काढलेल्या आदेशात २०२२ मध्ये मुदतीत संपणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या निवडणुका महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम २०१९ नुसार प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने हाेतील असे स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेसाठी २०११च्या जनगणनेनुसारची लाेकसंख्या विचारात घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नांदेड महापालिकेच्या २०२२ मध्ये हाेणाऱ्या निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड रचनेनुसारच घेतल्या जातील हे स्पष्ट झाले आहे. प्रभाग रचनेसाठी संपूर्ण शहराची माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच इतर अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता मनपा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.

महापालिकेत सध्या २० प्रभागात ८१ सदस्य आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीचे १५, अनुसूचित जमाती २, इतर मागासवर्ग प्रवर्गाचे २२, महिला २१ आणि खुल्या प्रवर्गातील २१ सदस्य आहेत. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने दिलेले आदेश व सूचनांचे पालन केले जाणार आहे.

सध्याच्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागाची सर्वाधिक लाेकसंख्या तब्बल ३९ हजार १४६ एवढी आहे. तर कमीत कमी संख्याही २२ हजार इतकी आहे. आगामी वॉर्ड आता जवळपास ७ हजार लाेकसंख्येचा राहणार आहे.

प्रतिक्रिया

१) महापाैर म्हणतात, प्रभाग पद्धतीच साेयीस्कर

सध्या असलेली प्रभाग पद्धती उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया महापाैर माेहिनी येवनकर यांनी दिली. या पद्धतीनुसार नगरसेवक एकत्रित येऊन प्रभागात कामे करू शकतात, तर नागरिकांनाही आपल्या अडचणी साेडविण्यासाठी पर्यायी नगरसेवक उपलब्ध असताे. त्यामुळे शासनाने प्रभाग पद्धती कायम ठेवताना चारऐवजी दाेन, तीन सदस्यीय प्रभाग तयार करावेत असेही त्या म्हणाल्या.

२) विराेधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी वॉर्ड रचनेचा सामान्य नागरिकांना लाभ हाेईल असे सांगितले. एकमेकांवरील जबाबदारी ढकलणाऱ्या नगरसेवकांपासून जनतेची सुटका हाेणार आहे. त्याच वेळी वॉर्डातील चांगल्या वाईट कामास एकच नगरसेवक जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

चाैकट....

काँग्रेसची मागणी हाेती प्रभाग कायम ठेवा

काँग्रेसच्या २४ ऑगस्ट राेजी झालेल्या मेळाव्यात काँग्रेसचे विधानसभेतील प्रताेद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी ड वर्ग महापालिकेच्या निवडणुका या प्रभाग रचनेनुसारच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे केली हाेती. यावेळी एखादा कमकुवत उमेदवार इतरांसाेबत निवडून आणू शकताे असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले हाेते. मात्र या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट राेजी राज्य निवडणूक आयाेगाचे एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचे आदेश धडकले आहेत.