शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला महागला

By admin | Updated: November 6, 2014 13:42 IST

यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे.

नांदेड : यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे. विहिरी-बोअरची पाणीपातळी खालावत असल्याने महागाईचा फटका भाजी बाजारावर जाणवू लागला आहे. बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटो, कोबी वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर भडकले होते. 

वाढत्या दरामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्यांना मात्र आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वाढलेल्या पालेभाज्यांच्या दरामुळे अनेकांनी पिशव्या भरुन भाजीपाला घेणे टाळल्याचे चित्र होते.
गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर आवाक्यात होते, तर दोन महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते. यानंतर पुन्हा टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ४0 रुपयांवर पोहोचले होते. तर बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोला १0 ते १५ रुपये किलो एवढाच दर मिळाला. तर हिरवी मिरची ६0 रुपये किलो, वांगी ४0 रुपये किलो, फूलकोबी ४0 रुपये किलो, पानकोबी ४0 रु.किलो, कोथिंबीर १00 रु.किलो, कांदे २0 रुपये किलो, लसूण ८0 रु.किलो, बटाटे ४0 रु.किलो, ढोबळी मिरची ६0 रु. भेंडी ४0 रु. किलो, कारले ६0 रु.किलो, पालक १0 रु.जुडी, शेवग्याच्या शेंगा ८0 रुपये किलो, गवार ८0 रुपये किलो याप्रमाणे दर होते. यंदाची पावसाची अल्प स्थिती पाहता उन्हाळ्य़ात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 
बहुभूधारक व अल्पभूधारक शेतकर्‍यांनी उन्हाळ्य़ातील उपलब्ध विहिरी, बोअरमधील पाण्याची स्थिती लक्षात घेवून केळी, हळद, गव्हाची लागवड न करता कमी दिवसांत येणार्‍या भाजीपाला लागवडीस पसंती दिली. अनेक विहिरी-बोअरमधील पाणीपातळी घटत असल्याने उत्पादक पुन्हा अडचणीत सापडणार असून महागाईचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे. पावसाअभावी भाजीपाल्याची लागवड केलीच नाही. बाजारात आवक कमी होत असून दरात वाढहोत आहे. (प्रतिनिधी)