शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फेबु्रवारीपर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे भूमीपुजन-राजूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:38 IST

शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष पूर्ण करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़

नांदेड : शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष पूर्ण करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ येत्या फेब्रुवारीपर्यंत पुतळ्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात येईल असे प्रतिपादन आ़अमरनाथ राजूरकर यांनी केले़ भक्ती लॉन्स येथे आयोजित वीरशैव समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी आ़राजूरकर म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे़ वीरशैव समाजातील अनेक जण आज मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत़ अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे़ नांदेडात वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात आहे़ त्यामुळे या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी जागा निश्चित करुन ती ताब्यात घेण्यात आली आहे़ पुतळ्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत़ या का कामाला आता गती मिळाली असून येत्या फेब्रुवारीपर्यंत भूमीपुजनही करण्यात येईल असेही ते म्हणाले़तत्पूर्वी आ़हेमंत पाटील म्हणाले, आपण सर्व महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे पाईक आहेत़ म़बसवेश्वरांनी अनिष्ट रुढी, परंपरांना मुठमाती दिली़ त्यामुळे त्यांच्या विचारावर चालण्याची आज गरज आहे़ तर आ़राम पाटील रातोळीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे यांनी केले़ हुरणे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून वीरशैव सभा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करते़ दरवर्षी वधू-वर परिचय मेळावाही घेण्यात येतो़ यशस्विततेसाठी समाजबांधव परिश्रम घेत आहेत़ सुत्रसंचालन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश मारकोळे पाटील यांनी केले़ यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातून तसेच शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून मोठ्या संख्येने वर-वधू उपस्थित होते़कार्यक्रमाला मुद्रांक व नोंदणी शुल्क उपायुक्त जयराज कारभारी, कृषी अधीक्षक रवि चलवदे, शंकरराव बोरकर, सुमीत मोरगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे,विश्वनाथ देशमुख, लक्ष्मीकांत गोणे, नंदकुमार दुधेवार, शरणअप्पा दाडे, अशोक उमरेकर आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सरचिटणीस राजन मिसाळे, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी हुरणे, देवराव चिंचोलकर, प्रभाकर डांगे, रितेश बुरांडे, दिलीप हुरणे, केदार नागठाणे, व्यंकटेश बारोळे, कल्याणराव येजगे, प्रभाकर उदगीरे, माधवराव एकलारे, विजय होकर्णे, सुरेश मिटकरी, अमोल नागठाणे, शिवकुमार बुक्के, वैशाली मारकोळे पाटील, विजया इंद्राळे, चंदा हळदे, डॉ़विजया साखरे, डॉ़सारिका धोंडे, सुजाता मिसाळे आदींनी परिश्रम घेतले़रातोळीकरांच्या निधीची घोषणा राजूरकरांनी केलीलिंगायत स्मशानभूमीसाठी माझ्या आमदार निधीतून दहा लाख रुपये आणि आ़राम पाटील रातोळीकर यांच्या निधीतून दहा लाख असे वीस लाख रुपये देणार असल्याची घोषणा आ़अमरनाथ राजूरकर यांनी केली़ यावेळी आ़राजूरकर यांनी रातोळीकर यांना उद्देशून तुमच्या परवानगीने ही घोषणा करीत असल्याचा चिमटाही काढला़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्न