शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

२८९ खात्यात वळते केले साडेचौदा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:53 IST

नांदेड - शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेत असलेले खाते हॅक करून १४ कोटी ५० लाख रुपये काढण्यात ...

नांदेड - शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेत असलेले खाते हॅक करून १४ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले होते. हे पैसे हॅकरने तब्बल २८९ खात्यात वळवले आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच शंकर नागरी बँकेने या ठिकाणी खाते उघडले होते.

शंकर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आयडीबीआय बँकेवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आरटीजीएस करण्याची व्यवस्था सहकारी बँकेत नाही. त्यामुळे शंकर सहकारी बँकेने ‘आयडीबीआय’मध्ये खाते उघडून त्याठिकाणी रक्कम डिपॉझिट ठेवली होती. आम्ही आयडीबीआयला एखाद्या खात्यात ‘आरटीजीएस’द्वारे पैसे पाठविण्यासाठी पुश करतो. आमचे या खात्यात १४ कोटी ५० लाख रुपये होते. त्यातच काही दिवसांपूर्वी आम्हाला बँकेने रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले, त्यावेळी ही बाब उघडकीस आली. त्यात तब्बल २८९ अनोळखी खात्यात ही रक्कम वळविल्याचे लक्षात आले. त्यानंतर आयडीबीआयला कळविण्यात आले. परंतु, त्यांनी चालढकल केली. १७ डिसेंबरला या खात्यातून पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात रक्कम पाठविण्यात आली. त्यानंतर २ जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरूच होता. आयडीबीआयला आम्ही अनेकवेळा ओटीपी आणि विवरण मागितले. परंतु, त्यासाठीही टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप पोकर्णा यांनी केला. खात्यातून व्यवहार झाल्यानंतर साधा मेसेजही याकाळात आला नाही. नेटबँकिंग सुरू करा म्हणून ८ डिसेंबर रोजीच बँकेला पत्र दिले होते. त्यामुळे या सर्व प्रकाराला आयडीबीआय बँक जबाबदार आहे. याबाबत पोलीस आणि आरबीआयकडे तक्रार दिली आहे. ‘आयडीबीआय’ने आमचे पैसे लवकर परत करावेत, असेही पोकर्णा म्हणाले. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत येथील आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमच्या बँकेकडून पथक तपासणी तसेच चौकशीसाठी येणार आहे. त्यानंतरच नेमका काय प्रकार झाला, ते पुढे येईल, असे सांगत सद्यस्थितीत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

आयटी सेल करणार तपासणी

बँकेतील सायबर हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून आयटीचे पथक येणार आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. हे पथक नांदेडमध्ये शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे.

इतर चार बँकांमध्ये असाच प्रकार

राज्यात इतर चार बँकेचे पैसेही आयडीबीआयच्या खात्यातून हॅकरने लंपास केले आहेत. त्यात ओझर मर्चंट, नाशिक, देवडा मर्चंट, नाशिक, धुळे विकास बँक आणि नगर शहर बँकेचा समावेश असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पोकर्णा यांनी दिली.