सोमवारपासून होणाऱ्या बदली प्रक्रियेत विनंती बदल्या तसेच आपसी संमती (म्युचल) बदल्या होतील का नाही याकडे लक्ष लागले आहे. किनवटला कार्यकाळ पूर्ण करणारे आता प्राधान्याने इतर ठिकाणी बदली मागणार आहेत. त्यामुळे या जागा रिक्त होतील. रिक्त जागांवर पुन्हा १०० टक्के नियुक्त्या करण्यात जि.प. यंत्रणेला कितपत यश येईल, हे पहावे लागणार आहे. ‘पेसा’ अंतर्गत किनवट, माहूर या आदिवासी तालुक्यातील सर्व जागा १०० टक्के भरणे क्रमप्राप्त आहे. विशेषता आरोग्य व शिक्षण विभागातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे किनवट-माहूर तालुक्यातील ग्राम विकास विभागाचा प्रशासकीय पूर्णता ठप्प झाला आहे.
प्रशासकीय बदल्या करताना प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील तर सामंजस्याने त्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा जि.प. कर्मचारी युनियनने व्यक्त केली आहे. समुपदेशन प्रक्रियेमध्ये विधवा, मतिमंद पाल्याचे पालक, पती-पत्नी एकत्रीकरण, दूर्धर आजार, कुमारिका, महिला कर्मचाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणीही कर्मचारी युनियनने केली आहे. याबाबत जि.प. अध्यक्षा, उपाध्यक्षा, सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
या बदली प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदही तालुकानिहाय दाखवावी, प्राधान्याने आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे भरावेत, रिक्त जागांचा समतोल सर्व तालुक्यात समाधान करावा. पती-पत्नी एकत्रीकरणाचा शासन निर्णयाप्रमाणे लाभ मिळावा, अशी मागणी जि.प. सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे.
चौकट-------------
आज होणार या विभागाच्या बदल्या
बदली प्रक्रियेअंतर्गत सोमवारी महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या होणार आहेत. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी प्रक्रिया संपेपर्यंत चालणार आहेत.