शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सातवी पासच्या अटीमुळे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

अर्धापूर : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, गावागावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

अर्धापूर : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, गावागावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ऐनवेळी सातवी पासची अट निवडणूक विभागाने लावल्यामुळे अनेकांची कोंडी होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आता रंगात आली आहे. गावागावात पॅनलचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी व उमेदवार निश्चित करण्याच्या कामात गाव पुढारी पॅनल प्रमुख गुंतले आहेत ठिकठिकाणी गुप्त बैठका, पॅनल निर्मिती, मतदारांच्या गाठीभेटी, भावकी, नातेवाईक यांच्या भेटी, चर्चा सुरू असून कोण सातवी पास आहे, याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

चांगले उमेदवार देऊन वाॅर्डात विजय कसा मिळवता येईल, या उद्देशाने उमेदवाराकडून प्रयत्न केले जात असतानाच निवडणूक आयोगाने सातवी पास असण्याची अट उमेदवारांना घातल्यामुळे निवडणुकीतील अनेकांची तारांबळ उडाली आहे. पॅनलच्या काही मातब्बर उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. हे उमेदवार म्हणजे जुनी प्रमुख नेतेमंडळी असून, त्यांच्या संपूर्ण गावावर प्रभाव आहे. मात्र, सातवी पास नसल्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचा पत्ता कट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.