शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

कुस्त्यांचा फड रद्द बाऱ्हाळी - मुखेड तालुक्यातील राजुरा बु. येथे खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात येतात. यावेळी कोरोनाच्या ...

कुस्त्यांचा फड रद्द

बाऱ्हाळी - मुखेड तालुक्यातील राजुरा बु. येथे खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात येतात. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे त्यांचा फड रद्द करण्यात आला. यात्रा समिती व गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

१७ नामनिर्देशन पत्र दाखल

मुदखेड - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये बारड १०, मुगट ५ व वाडी मुक्ताजी येथून दोन नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी यावेळी दिली.

१९ जणांना दंड

मुदखेड - अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १९ जणांना पोलिसांनी पकडून दंड सुनावला. २६ डिसेंबर रोजी शहरातील उमरी चौरस्ता भागात ही कारवाई करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, स.पो.नि. सुरेश भाले, सहाय्यक फौजदार गौतम जोंधळे, जमादार विठ्ठल उतकर, पो.कॉ. माधव पवार, विनायक मठपती आदी सहभागी होते.

हातभट्टीवर छापा

मुदखेड - तालुक्यातील डोणगाव येथील कमानीजवळ हातभट्टीची दारु विकताना पोलिसांनी एकाला पकडले. यावेळी ४० लिटर दारु जप्त करण्यात आली. जमादार बाचेवाड, चंद्रशेखर मुंडे, विनायक मठपती, आवळे यांनी ही कारवाई केली. जमादार बाचेवाड तपास करीत आहेत.

वाजपेयी यांची जयंती

मुदखेड - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती भाजपच्यावतीने साजरी करण्यात आली. महिला जिल्हा सरचिटणीस केतकी चौधरी, माजी नगरसेविका सुधा चौधरी, सुरेखा यरपलवाड, सारिका होळकर, दैवशाला चक्करवार, शोभा मोडवान, प्रियंका मळगदे, सीमा मोडवान, तालुकाध्यक्षा जया देशमुख, सुनीता मांडगुळकर, दीपा गोडसे, क्रांती रायपत्रेवार, अरुणा पेदे आदी उपस्थित होते.

अखंड हरिनाम सप्ताह

नायगाव - बरबडा येथील दत्त मंदिर तसेच कपिलेश्वर मंदिर येथे दत्त देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. २८ रोजी दत्त जन्म साजरा करुन अखंड दत्तनामाचा समारोप करण्यात येईल. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. कार्यक्रमासाठी दिगंबर शेवाळे, दिगंबर धर्माधिकारी, गंगाधर भुसलवाड, दत्ता बकेवाड, मारोती आळणे, माधव मोदड, अंजनाबाई मोदड, तुकाराम सूर्यवंशी, शंकर पवार आदी उपस्थित होते.

वाजपेयी यांना अभिवादन

नायगाव - तालुक्यातील वजीरगाव येथे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैजनाथ ढगे, नागोराव ढगे, संजय ढगे, किशन ढगे, गोपीनाथ ढगे, साहेबराव ढगे, माधव वाघमारे, चंपती भदरगे आदी उपस्थित होते.

मोबाईल चोरीच्या घटना

कुंडलवाडी - येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून खिसे कापणे तसेच पर्स लांबविण्याचे प्रकारही सुरू आहे. मंगळवार व शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबविणे, खिसे कापणे आदी प्रकार सुरू आहेत. २५ डिसेंबर रोजी पाटोदा थडी येथील हौसाजी बोमले यांचा मोबाईल बाजारातून लांबविण्यात आला.