शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

'हद्दीचे काम थांबवा नाहीतर आत्महत्या करतो'; शेतकऱ्याने उडवली वन विभागाची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 18:37 IST

शुक्रवारी ( दि. १९) सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान गट क्रमांक ३८३ मधील जमिनीवर वनविभागाने काम सुरु केले.

हदगाव : मनाठा वनपरिक्षेत्र परिमंडळात वन विभागाने हद्द आखाणीचे काम सुरू करताच एका शेतकऱ्याने त्यावर आक्षेप घेतला. ऐवढ्यावरच न थांबता शेतकऱ्याने काम थांबवले नाही तर विष प्राशन करण्याची धमकी दिली. यामुळे वन विभागाला काम थांबवून त्या शेतकऱ्यावर दिवसरात्र लक्ष ठेवण्याची वेळ आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनाठा येथिल शेतकरी शेख हिदायत अली यांनी गट क्रमांक ३८३ मधील पाच एकर शेती आपली असून त्याबद्दल महसूल विभागाचे पुरावे असल्याचे म्हटले आहे. तर वन विभागाने सुद्धा ही जमीन त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. वनविभागाने तेथील अतिक्रमण काढून सन २०१९ मध्ये वृक्षलागवड केली. यामुळे मनाठा परिसरातील अनेक शेतकरी भुमीहीन झाले आहेत. काही गप्प बसले तर काहींनी कोर्टात दाद मागितली. कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. तेव्हा वन विभागाची जमीन महसूल विभागास गायरान देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यावर ताबा घेतला. 

शुक्रवारी ( दि. १९) सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान गट क्रमांक ३८३ मधील जमिनीवर वनविभागाने काम सुरु केले. तेव्हा शेतकरी शेख हिदायत अली यांनी त्यास विरोध केला. काम थांबत नसल्याने शेवटी शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे वन विभागाने काम बंद केले. तसेच शेतकऱ्याने चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून एक चतुर्थ श्रेणी कर्मचारीच त्याच्या निगराणी ठेवला. दर एक तासाला वरिष्ठ शेतकऱ्याची माहिती घेत होते. आज दिवसभरात वन विभाग आणि शेतकरी दोघांच्या बाजू पोलिसांनी ऐकून घेतल्या. सध्या काम बंद असून न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रशासनास प्रतीक्षा आहे. या सर्व प्रकाराने वन विभागाची चांगलीच झोप उडाल्याची चर्चा रंगली होती.

टॅग्स :forest departmentवनविभागRevenue Departmentमहसूल विभागNandedनांदेड