चौकट- प्रति हेक्टरी बयाणे दर ७५ किलो वरून ५० ते५५ किलो वर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटर वापरून पेरणी करावी, सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाणांची पेरणी तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅ थायरम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रायझेबियम व पीएचबी जिवाणू संवर्धकांची प्रत्येकी दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर पेरणी करावी, असे आवाहनही रवीकुमार सुखदेव यांनी केले आहे.
सोयाबीनचे बियाणे दोन वर्षापर्यंत वापरता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST