शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रबी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. ...

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रबी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळींनंतर करडईचा एक-तीन ओळींत पेरा होत असे. रबी पिकांची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. तेव्हा सर्वात फायदेशीर पीक असायचे. मात्र, वर्तमानात करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.

करडई पीक अर्धापूर तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रबी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. करडई पिकाच्या तुलनेत हरभरा जास्त उत्पन्न देणारे पीक ठरले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पन्न देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे आणि इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्याला मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकरी बागायतदार झाला आहे. पाण्यामुळे मोठंमोठी पिके घेण्यास सुरुवात झाली. यामुळे करडई पीक अर्धापूर तालुक्यातून नामशेष झाले आहे.

इसापूर धरणातून १९८५ ते १९८६ या काळात कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवसांच्या अंतराने मिळत असत. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रबी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला. रबी हंगामात आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाले. केळीपासून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकांपासून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. मात्र, करडई पीक या भागातून नामशेष झाले आहे.