शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. ...

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळीनंतर करडईचा एक-तीन ओळीत पेरा होत असे. रब्बी पिकांची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. तेव्हा सर्वात फायदेशीर पीक असायचे. मात्र, वर्तमानात करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.

करडई पीक अर्धापूर तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. करडई पिकाच्या तुलनेत हरभरा जास्त उत्पन्न देणारे पीक ठरले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पन्न देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे आणि इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्याला मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकरी बागायतदार झाला आहे. पाण्यामुळे मोठमोठी पिके घेण्यास सुरुवात झाली. यामुळे करडई पीक अर्धापूर तालुक्यातून नामशेष झाले आहे.

इसापूर धरणातून १९८५ ते १९८६ या काळात कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवसांच्या अंतराने मिळत असत. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला. रब्बी हंगामात आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाले. केळीपासून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकांपासून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. मात्र, करडई पीक या भागातून नामशेष झाले आहे.