शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यातील गावपुढाऱ्यांची धावपळः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेली संभाव्य महिला उमेदवारांची कागदपत्रे ...

कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेली संभाव्य महिला उमेदवारांची कागदपत्रे जमवाजमव करताना कसरत होत असल्याचे चित्र आहे.आपल्या पँनलमधील उमेदवाराची अचूक माहिती सादर करण्यासाठी गावपुढाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.

तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे.परंतु आपले पँनल सक्षम असावे. कोणतीही त्रुटी नामनिर्देशन दाखल करताना असू नये .यासाठी गावपुढारी जागरूकपणे राजकीय हालचाली करत आहेत.त्यातच ग्रामपंचायतीत महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागावर उमेदवारी देताना पँनलप्रमुखांचा कस लागत आहे.पुरूषांनी तयारी केलेल्या वॉर्डातील जागा महिलेला आरक्षित झाल्याने उमेदवारी दाखल करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जात प्रमाणपत्र काढताना तारांबळ

अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती व नागारिकांचा मागास प्रवर्ग आदी जागेवर उमेदवारी दाखल करताना जात प्रमाणपत्र असणे व जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केलेली पावती महत्त्वाची आहे महिले करिता आरक्षित जागेवर तर उमेदवारी देत असताना दमछाक होत आहे. माहेरकडील पुरावे सादर करणे,माहेर ज्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आहे.येथून प्रमाणपत्र काढणे आव्हानात्मक झाले आहे.त्यासाठी पुरावे,वंशावळ आदीसाठी पुरूषांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे.

नाममात्र उमेदवारी दाखल

२३ डिसेंबर पासून उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ होऊनही नाममात्र उमेदवारी दाखल झाली आहे.दि.२३ रोजी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ डिसेंबर रोजी १२ जणांनी उमेदवारी दाखल केली.त्यात फुलवळ- १, हाळदा -२ व लाडका -९ येथील उमेदवारांचा समावेश आहे.अशी माहिती नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,उत्तम जोशी, मन्मथ थोटे यांनी दिली.

सलग ३ दिवस सुट्टी असल्याने ऑनलाईन माहिती भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ चालू होती.३ दिवस ऑनलाईन माहिती भरताना ग्रामीण भागात नेटवर्क लपाछपी करत असल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मोजकेच दिवस नामनिर्देशन दाखल करायला शिल्लक असल्याने मोठी गर्दी होण्याचे संकेत आहेत.त्यात अचूक माहिती भरून उमेदवारी कायम राहण्यासाठी गावपुढाऱ्यांचा राजकीय कस लागणार आहे.