शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नामांतराचा संघर्ष जिंकला, राजकीय संघर्षाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST

नांदेड : औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीने जिंकला, मात्र आंबेडकरी चळवळीला अद्यापही ...

नांदेड : औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीने जिंकला, मात्र आंबेडकरी चळवळीला अद्यापही राजकीय संघर्ष जिंकता आला नाही त्याचे काय, असा सवाल प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी उपस्थित केला.

नामांतर दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी १६ वर्षे चाललेल्या संघर्षाला १९९४ मध्ये यश मिळाले. नामांतर लढ्यात नांदेड जिल्ह्यातील पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे हे शहीद झाले. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमवीरांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी महात्मा फुले पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रा. देवीदास मनोहरे, पी.एस. गवळे, जे.डी. कवडे, बबिताताई पोटफोडे, नंदकुमार बनसोड, रवी गायकवाड, राजेश रापते, विजय गोडबोले, ॲड. मधुकर टेळकीकर, ॲड. बादलगावकर, शीलरत्न चावरे, भगवान गायकवाड, बालाजी मोरे, दत्ताहरी धोत्रे, विकास इंगोले, कपिल वाबळे, प्रबुद्ध चित्ते, गब्बर सोनवणे, धम्मानंद गजभारे, व्यंकट इंगोले आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहिदांना अभिवादन करण्यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात सुरेश गायकवाड म्हणाले, आंबेडकरी चळवळीने नामांतराचा लढा अत्यंत प्रखरपणे लढला. अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठलेली चळवळ हा लढा जिंकला खरा, मात्र आंबेडकरी चळवळीला राजकीय संघर्ष आजपर्यंत स्वतंत्रपणे जिंकता आला नाही. आजही शैक्षणिक, सामाजिक, असंख्य प्रश्न आहेत. शैक्षणिक, सामाजिक, गायरान अशा विविध प्रश्नांवर आंबेडकरी आंदोलने उभारताना समाज एकत्र येतो, मात्र राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाज एकत्र येत नाही, त्यामुळे आजचा युवक सैरभैर झाला आहे. ज्यांच्याकडे राजकीय नेतृत्व आहे, त्यांचा पक्ष हा मालकी पक्ष झाला आहे. सत्ता व्यक्तिकेंद्रित झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुणीही अमलात आणत नाहीत. कोणत्याही पक्षात कार्यकर्त्यांची दुसरी सक्षम फळी तयार होऊ दिली नाही, त्यामुळे कौटुंबिक वारशाशिवाय चळवळीतील राजकीय पक्षांना अन्य नेतृत्व मिळाले नाही. परिणामी सैरभैर झालेला युवक शत्रूपक्षाच्या सापळ्यात अडकत असल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शहीद पोचीराम कांबळे यांची सून जयश्री बाबू कांबळे आणि शहीद चंदर कांबळे यांची कन्या मीनाताई यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.