शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

दिवसा वीजपुरवठा करा पळशी - विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने दिवसा वीजपुरवठा बंद ठेवून रात्रीच्या वेळेस पुरवठा करण्यात येत आहे. ...

दिवसा वीजपुरवठा करा

पळशी - विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने दिवसा वीजपुरवठा बंद ठेवून रात्रीच्या वेळेस पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे.त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

कोविड योद्धयांचा गौरव

बामणीफाटा - कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा २४ डिसेंबर रोजी चिंचगव्हाण येथे एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आय.जी.बेग व चंद्रे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले.यामध्ये इस्माईल पिंजारी, हरिश्चंद्र चिल्लोरे, प्रेमराव भूतनर, लक्ष्मण लोमटे, संतोष मस्के आदींचा समावेश आहे.

मोकाट जनावरांचा त्रास

नांदेड - सिडको भागातील रुग्णालय व नागरी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्यामुळे मोकाट जनावरे या ठिकाणी एकत्र येत आहेत. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

प्लास्टीक बॅगचा वापर

धर्माबाद - शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकचा वापर नागरिक करत असून त्यामुळे प्लास्टीक कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने कॅरी बॅगवर बंदी घातली असली तरी नागरिक त्याचा सर्रास वापर करताना आढळून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

मारतळ्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मारतळा - मारतळा परिसरातील अनेक गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरू असून अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. परिसरातील कापसी बु., वाळकी खुर्द, डोनवाडा, कापसी खु., वाळकी खु., डोलारा, गोळेगाव, सुगाव, धनज खु., पिंपळदरी, कामळज, जोमेगाव या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.