शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

दिवसा वीजपुरवठा करा पळशी - विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने दिवसा वीजपुरवठा बंद ठेवून रात्रीच्या वेळेस पुरवठा करण्यात येत आहे. ...

दिवसा वीजपुरवठा करा

पळशी - विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने दिवसा वीजपुरवठा बंद ठेवून रात्रीच्या वेळेस पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

कोविड योद्धयांचा गौरव

बामणीफाटा - कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा २४ डिसेंबर रोजी चिंचगव्हाण येथे एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आय.जी.बेग व चंद्रे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये इस्माईल पिंजारी, हरिश्चंद्र चिल्लोरे, प्रेमराव भूतनर, लक्ष्मण लोमटे, संतोष मस्के आदींचा समावेश आहे.

मोकाट जनावरांचा त्रास

नांदेड - सिडको भागातील रुग्णालय व नागरी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्यामुळे मोकाट जनावरे या ठिकाणी एकत्र येत आहेत. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

प्लास्टिक बॅगचा वापर

धर्माबाद - शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर नागरिक करत असून त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने कॅरी बॅगवर बंदी घातली असली तरी नागरिक त्याचा सर्रास वापर करताना आढळून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

मारतळ्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मारतळा - मारतळा परिसरातील अनेक गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरू असून अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. परिसरातील कापसी बु., वाळकी खुर्द, डोनवाडा, कापसी खु., वाळकी खु., डोलारा, गोळेगाव, सुगाव, धनज खु., पिंपळदरी, कामळज, जोमेगाव या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.