शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे ; चिमुकले विविध खेळात मग्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

शासनाने ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु ग्रामीण भागात ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. जेथे प्राथमिक गरजा नीटपणे ...

शासनाने ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु ग्रामीण भागात ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. जेथे प्राथमिक गरजा नीटपणे भागात नाहीत तेथील पालकांना दहा बारा हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन कसा मिळेल जर मिळालाच तर ग्रामीण भागात नेटवर्क नसते. त्यामुळे शासनाची ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात सपशेल अपयशी ठरले आहे.

ठरलेल्या वेळेत अभ्यास होमवर्क करून शाळेच्या वेळेत गडबड घाईघाईत शाळेत जाणारे चिमुकले पाटी पुस्तके अडगळीत टाकून मनसोक्तपणे विविध प्रकारचे खेळ खेळण्यात मग्न असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. याचा दुष्परिणाम बालकांच्या भविष्यात होणार आहे. चिमुकल्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.

गेल्या सहा सात महिन्यापासून शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे पालक सुध्दा आपल्या पाल्याला अभ्यास करण्यासाठी तगादा लावला नाही. अथवा अभ्यासाबद्दल विचारणा केली नाही. कारण शाळाच बंद आहेत मग कुठला आणि कसला अभ्यास कराया लावणार? बहुतांश पालक आपापल्या कामात व्यस्त असतात तर अनेक पालक निरक्षर आहेत. शिक्षणाचा मुळ पाया प्राथमिक शिक्षण आहे. शिक्षण विभाग चिमुकल्याना पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देईल यात काही वाद नाही परंतु झालेले शिक्षणाचे नुकसान कसे भरून काढणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . त्यावर शिक्षण विभाग काय मार्ग काढणार या कडे पालकांचे लक्ष लागून आहे.