शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सचखंड एक्स्प्रेसच्या स्वच्छतेविषयी प्रवाशांनी दिला ‘व्हेरी गुड’ ग्रेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

गाडी क्रमांक ०२७१५/०२७१६ हुजूर साहिब नांदेड -अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस १ जून २०२० पासून सुरू आहे. नुकतेच ...

गाडी क्रमांक ०२७१५/०२७१६ हुजूर साहिब नांदेड -अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस १ जून २०२० पासून सुरू आहे. नुकतेच या गाडीच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे या गाडीच्या स्वच्छतेमध्ये खूप प्रगती झाली आहे. या गाडीमध्ये सर्व टॉयलेट हे बायो-टॉयलेट आहेत. या बायो-टॉयलेटच्या पूर्ण स्वच्छतेकरिता विशिष्ट मशीन-बायोटेंक एवाक्युशेन मशीन वापरण्यात येत आहे. यामुळे बायो-टॉयलेटच्या स्वच्छतेमध्ये प्रगती साधता आली आहे. तसेच या गाडीच्या डब्यांची आतून आणि बाहेरून स्वच्छता करण्याकरिता नवीन कंत्राटदाराकडून विशेष केमिकल वापरण्यात येत आहे. यामुळे गाडीची स्वच्छता खूप चांगली होत आहे. प्रवासी सुविधेत वाढ करण्याकरिता आगाऊ मनुष्यबळांसोबतच प्रवाशांना लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याकरिता विशेष खरेदी करण्यात आली आहे.

प्रवास सुरू झाल्यानंतर रेल्वे डब्यामध्ये वारंवार स्वच्छतेकरिता ऑनबोर्ड हाऊस किपिंग (ओ.बी.एच.एस.)ची सुविधाही पुरवण्यात आली आहे. ओ.बी.एच.एस. कर्मचाऱ्यांचे काय कार्य असते हे दर्शवणारे बोर्ड गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये लावण्यात आले आहेत. तसेच जर प्रवासी उपलब्ध सुविधेविषयी व स्वच्छतेविषयी समाधानी नसल्यास त्यांनी तक्रार करावयाचा नंबरसुद्धा त्या बोर्डवर छापला आहे. तसेच या गाडीमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांकडून फीड बेक फॉर्म भरून घेतला जात आहे. या फॉर्ममध्ये बहुतांश प्रवासी समाधानी आहेत. बहुतांश प्रवाशांनी स्वच्छतेला उत्कृष्ट तसेच खूप चांगला-व्हेरी गुड असे ग्रेड दिले आहेत. सोबत काही फिड बॅक फोर्म जोडले आहेत.