शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

एकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

दोन लाखांसाठी छळ कंधार - तालुक्यातील गोगदरी येथे विवाहितेचा माहेराहून २ लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा ...

दोन लाखांसाठी छळ

कंधार - तालुक्यातील गोगदरी येथे विवाहितेचा माहेराहून २ लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. २८ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक मांगूळकर तपास करीत आहेत.

कविता संग्रहाचे प्रकाशन

किनवट - येथील रामजी कांबळे यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन ३ जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रशांत ठमके, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.अशोक गायकवाड, गझलकर मधु बावलकर, भीमराव हाटकर, डॉ.अंबादास कांबळे, ॲड.मिलींद सप्रे, महेंद्र नरवाडे, उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर आदींची उपस्थिती राहणार आहे.

दत्तनामाचा गजर

अर्धापूर - शहरासह तालुक्यात दत्तजयंती सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.दत्त भक्तांची यावेळी मोठी गर्दी झाली होती. अर्धापुरातील बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, किशनबापू आश्रमात दत्तजयंती सोहळा घेण्यात आला. तसेच देळुब, पार्डी, मेंढला, लोन आदी ठिकाणीही सोहळा पार पडला. मंदिरांना फुलांनी सजविण्यात आले होते.

साधेपणाने दत्तजयंती

हदगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामसा येथे साधेपणाने दत्तजयंती साजरी करण्यात आली.दत्त मंदिरात अशोक कोडगीरवार यांच्या हस्ते श्रीला अभिषेक करण्यात आला. दुपारी दत्त जन्माचा पाळणा होऊन आरती झाली. यावेळी प्रकाश देशमुख, अमृता वारकड यांनी मार्गदर्शन केले. रात्री किशन महाराज वेणीकर यांच्या हस्ते महापूजा झाली.

हरभऱ्याचा पेरा वाढला

मुक्रमाबाद - मुक्रमाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. थंडीचे वातावरण हरभरासाठी पोषक ठरत असल्याने शेतकरी हरभराकडे वळले होते.

दोन हायवा जप्त

लोहा - लोहा महसूल प्रशासनाने २८ डिसेंबर रोजी कारवाई करत दोन हायवा टिप्पर जप्त केले. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी ही कारवाई केली. एक हायवा टिप्पर लोहा तहसीलमध्ये तर दुसरा सोनखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.या कारवाईत मंडळ अधिकारी कटारे, मारोती कदम, कांबळे, जाधव यांचा सहभाग होता.

तालुकाध्यक्षपदी चव्हाण

धर्माबाद - भाजपा किसान मोर्चाच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पिराजी पाटील चव्हाण यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, महिला आघाडीच्या चित्रा गोरे, बाबुराव केंद्रे, रवींद्र पोतगंटीवार, तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

वायर लंपास

हदगाव - तालुक्यातील बोरगाव-हस्तरा येथील ११ केव्हीच्या पोलवरील ४०० फुट तार चोरट्यांनी लांबविल्याची घटना २३ डिसेंबरच्या रात्री घडली. २४ डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. तारेची किंमत ४ हजार रुपये होती अशी फिर्याद सहाय्यक अभियंता संजय महनूर यांनी पोलिसात दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

विवाहितेचा छळ

अर्धापूर - तालुक्यातील डौर येथील विवाहितेने माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा नोंदविला. तू चांगली राहत नाहीस, तुझे वागणे चांगले नाही, तुला स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून आरोपी छळ करीत होते, अशी फिर्याद पिडीतेने अर्धापूर पोलिसात दिली.