शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

श्री गीता जयंतीनिमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

नांदेड : श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त श्री दासगणू संत भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ...

नांदेड : श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त श्री दासगणू संत भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गीतेच्या १४व्या अध्यायाचे पठण/पाठांतर स्पर्धा कुसुम सभागृहात झाल्या. ११ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रा. नंदकुमार मेगदे लिखित श्रीबदरीनाथ, कैलास-मानस सरोवरयात्रा- अद्भुत अनुभव या पुस्तकाचे विमोचन आ. मोहन अण्णा हंबर्डे, पत्रकार शंतनु डोईफोडे व प्रा. डॉ. दीपक बच्चेवार यांच्या हस्ते करण्यात आले. पठण/पाठांतर स्पर्धेत टायनी एंजल्स स्कूल, लक्ष्मीनगर- प्रथम, ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कूल, पुयणी- द्वितीय, तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेड या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

याप्रसंगी डॉ. बच्चेवार यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात गीतेचा समावेश निश्चितपणे असेल अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाला सहभागी संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांसह समस्त मेगदे कुटुंबीय आणि श्री दासगणू संत भक्त मंडळाचे सदस्य तसेच वसंत मैया, विजय होकर्णे, आदीही उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. गवई यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. डॉ. प्रदीप वेसणेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले. निमीष रायलवार यांनी आभार मानले. युवासंघाच्या सदस्यांनी गायलेल्या ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांच्या राष्ट्रसंरक्षण पोवाड्यातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.