शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता उमेदवारांचे अवतण ताई, अक्का, वहिनी गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, ...

लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, भाऊ, अण्णा, मामा, मामी गावाकडे कधी येणार? यावेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या-येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल’, असेही सांगितले जात आहे.

लोहा तालुक्‍यासह जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडत असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी पार पडली, अर्ज माघारीची मुदत ४ जानेवारी असून, त्यानंतर उमेदवारांना लगेच चिन्हांचे वाटप होणार आहे. तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या ७७४ जागांची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. या जागांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असले, तरी मीच सरपंच होणार! अशा अविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे.

तालुक्‍यातील बहुतांश नागरिक पुणे, मुंबई व इतर शहरांकडे रोजगार किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यानंतर हे गावाकडे आलेले ग्रामस्थ पुन्हा शहरात गेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने निवडणूक अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त होते. शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत, यासाठी त्यांना आता गळ घातली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मन:स्तापाचा फटका या मतदारांकडून बसण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार का? हे ही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.