शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणावर मात करणारा नांदेडचा ‘यशोदामाता अंगतपंगत’ पॅटर्न आता पोहोचणार राज्यभर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 18:25 IST

राज्यातील सर्वच अंगणवाड्यामध्ये हा ‘नांदेड पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. 

ठळक मुद्देनांदेड पॅटर्न राज्यभर राबविणार कुपोषणावर मात करण्यासाठी निर्णय

नांदेड : येथील जिल्हा परिषदेने पोषण अभियानासंबंधी राबविलेल्या ‘अंगत-पंगत’ उपक्रमामुळे कमी वजनांच्या बालकांच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून आली. याबरोबरच कुपोषण प्रतिबंध करण्यास तसेच माता मृत्यूचे प्रमाण, नवजात व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम सहाय्यभूत ठरला आहे. त्यामुळेच आता राज्यातील सर्वच अंगणवाड्यामध्ये हा ‘नांदेड पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. 

कुपोषण कमी करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनिस तसेच महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी समन्वयाने अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील गरोदर महिलांसाठी मध्यान्ह भोजन कालावधीत एकत्रित ‘अंगत-पंगत’चे आयोजन केले. या उपक्रमामुळे जिल्ह्यात ६ महिने ते एक वर्षे या कालावधीत गरोदर महिलांच्या वजनामध्ये अपेक्षित वाढ दिसून आली. अंगत-पंगत झाल्यानंतर या गरोदर महिलांनी लोहयुक्त गोळ्याचे सेवन केल्याने त्यांच्या हिमोग्लोबीनच्या प्रमाणामध्येही वाढ झाली. तसेच या महिला दैनंदिन संपर्कात राहिल्याने ४ आरोग्य तपासण्याही झाल्या. याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम कुपोषण प्रतिबंध, माता मृत्यूचे प्रमाण, नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास सहायभूत ठरल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तो राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश महिला व बालविकास विभागाने ६ मार्च रोजी जारी केले. 

अंगणवाडी केंद्रात  असा असेल उपक्रम या उपक्रमांतर्गत नोंदणीकृत गरोदर महिला स्वत: मध्यान्ह आहार डब्यामध्ये घेऊन अंगणवाडी केंद्रात येतील. तेथे त्या सहभोजनाचा आस्वाद घेतील. या पंगतीनंतर गरोदर महिला आप-आपसात चर्चा करतील. अंगत-पंगत उपक्रमासाठी येताना त्यांना पुरविण्यात आलेल्या लोहयुक्त गोळ्यांचे पॅकेट घेऊन महिला येतील आणि पंगत उरकल्यानंतर या गोळ्यांचे सेवनही करतील.  

टॅग्स :NandedनांदेडState Governmentराज्य सरकारfoodअन्न