महापालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत पुनर्वसन साईट येथे घरकुल बांधकाम करण्यात आले आहे. श्रावस्तीनगर साईट क्रमांक ३४, गोवर्धनघाट व गौतमनगर, सांगवी या ठिकाणी २६० घरकुल वाटप करणे शिल्लक आहे. या घरकुलांची दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
चौकट
-------------
सभागृह ठरवणार घरकुल वाटपाचे धोरण
शासननिर्णयाप्रमाणे घरकुल वाटपामध्ये दिव्यांगासाठी किमान ५ टक्के राखीव घरकुल ठेवण्याबाबत तरतूद आहे. नांदेड शहरातही दिव्यांगांनी घरकुलांची मागणी केली आहे. महापालिकेकडे १ हजार २८ अर्ज प्राप्त झाले असून उपलब्ध घरकुलांची संख्या पाहता अर्ज जास्त आहेत. त्यामुळे घरकुल वाटपाबाबत धोरण ठरविण्यासाठी सभागृहापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. २७ मे रोजी होणाऱ्या सभेत याबाबत निर्णय होईल, असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले आहे.