लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अत्याचा-याच्या सदर घटना २०१२ मध्ये घडली होती.२७ डिसेंबर २०१२ रोजी ८ वर्षीय मुलगी खेळत असताना आरोपी आनंद धर्माजी कोल्हे याने सदर मुलीला घरामध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांनाही मारुन टाकतो, अशी धमकी दिली. मात्र सदर घटना कळल्यानंतर पिडीत मुलीच्या आजीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन भादंवि २५४, ३७६ व पोस्को कायदा कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक बी.एम. सरवदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप यांच्या समोर चालले. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तर बचाव पक्षाकडून पाच जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. अखेर न्यायालयाने आरोपी आनंद धर्माजी घुले (वय १९) यास १० वर्षे सक्त मजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणातील अन्य दोन आरोपी प्रविण मारोती घुले (वय २८), व आरमाजी तुकाराम घुले (वय ६२) यांना निर्दोष सोडण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन आगणे तर आरोपीच्यावतीने अॅड. काशिनाथ शिंदे यांनी काम पाहिले. दरम्यान, निकालानुसार दंडाची रक्कम कमी असल्याने सरकार पक्षाने पिडीतास जास्त रक्कम देण्याची मागणी केली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:03 IST
आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अत्याचा-याच्या सदर घटना २०१२ मध्ये घडली होती.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस कारावास
ठळक मुद्देन्यायालयाचे आदेश : पोस्को कायद्यानुसार दाखल होता गुन्हा