शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या - १०८ ग्रामपंचायतींत रंगणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

१ लाख ५६ हजार नागरिक बजावणार मतदानाच हक्क बामनी फाटा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच बिगुल वाजताच गावखेड्यातील पुढारी, विविध पक्षांचे ...

१ लाख ५६ हजार नागरिक बजावणार मतदानाच हक्क

बामनी फाटा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच बिगुल वाजताच गावखेड्यातील पुढारी, विविध पक्षांचे नेते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सक्रिय झाले असून, मतदारांच्या भेटी घेत आहेत.

आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर हेपण सक्रिय झाले. बाबूराव कोहळीकर यांच्या भूमीकडे विविध राजकीय नेत्यांचे लक्ष असून, वंचित बहुजन आघाडीही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याने हदगाव तालुक्यात या निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. तालुक्यात १ लाख ५६ हजार २४ मतदार हक्क बाजवणार आहेत. याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसह तीन नायब तहसीलदार व १८ पथकांची नियुक्ती झाली. जवळपास १५०० कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता नियुक्ती करण्यात आली. या निवडणुकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्त आदेश उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिले.

उमरीत तालुकास्तरीय स्वाध्याय कार्यशाळेत विद्यार्थी पटनोंदणीचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरी : गट साधन केंद्र उमरीअंतर्गत तालुकास्तरीय ऑनलाइन स्वाध्याय कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या १००% पटनोंदणीचा संकल्प करण्यात आला.

या कार्यशाळेला शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी व गट साधन केंद्रातील सर्व समग्र कर्मचारी उपस्थित होते. विषय साधन व्यक्ती पी. ए. नंदेश्वर यांनी सूत्रसंचालन करीत सर्व उपस्थितांचे स्वागत केले. एससीईआरटी पुणेमार्फत आयोजित इयत्ता पहिली ते दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या स्वाध्याय उपक्रमाविषयी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या शाळेतील १०० टक्के विद्यार्थी कसे नोंदणी करता येतील, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्रीय प्रा. शाळा गोळेगाव येथील तंत्रस्नेही शिक्षक सतीश पाटील व कें. प्रा. शाळा बितनाळ येथील तंत्रस्नेही शिक्षक लक्ष्मण वडमिले यांनी प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी व प्रश्नावली कशी सोडवावी यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती टी. यू. पतंगे व विशेष शिक्षणतज्ज्ञ पगारे यांनीही स्वाध्याय उपक्रमाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तांत्रिक सहकार्य विषय साधन व्यक्ती पी. ए. नंदेश्वर व कें. प्रा. शाळा गोळेगाव येथील तंत्रस्नेही शिक्षक सतीश पाटील यांनी केले. पतंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. अशाप्रकारे आनंददायी पद्धतीने कार्यशाळेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने व स्वाध्याय सुलभ रीतीने होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या.