शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

माणूस जन्माने नव्हे तर जगण्याने बौद्ध असतो - दीपक कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

नांदेड तालुक्यातील खुरगाव येथे भारतीय मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भंते पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्कुसंघ, श्रामणेर ...

नांदेड तालुक्यातील खुरगाव येथे भारतीय मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भंते पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्कुसंघ, श्रामणेर प्रशिक्षणार्थी, ज्येष्ठ कवी दु.मो. लोणे, साहित्यिक तथा धम्मसंदेश व धम्मदान यात्रा संकल्पक गंगाधर ढवळे, माजी उपप्राचार्य डॉ. साहेबराव इंगोले, ॲड. तेलगोटे, कुमार कुर्तडीकर, निवृत्ती लोणे, राज गोडबोले यांची उपस्थिती होती.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे २५ डिसेंबर हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. डॉ. कदम म्हणाले, मुलगा मुलगी हा भेद न करता प्रत्येकाने आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण द्यावे.

सकाळच्या सत्रात धम्मसेवक महास्थविर यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. तत्पुर्वी भिक्खुसंघांनी महास्थविर यांचे स्वागत केले. तसेच डॉ. दीपक कदम व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गंगाधर ढवळे, रणजीत गोणारकर यांनी डॉ. कदम यांचा सत्कार केला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, भंते मेत्तानंद, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकीर्ती, भंते श्रद्धानंद भंते सुदर्शन भंते सुमेध, भंते महानाम, भंते अश्वजीत, भंते शीलभद्र उपस्थिती होती. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन भीमसंदेश पथकातील सहभागी उपसकांनी याचना केल्यानंतर भंते गणांनी उपासकांना त्रीसरण पंचशील दिले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ''''''''डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?'''''''' या विषयावर ज्येष्ठ व्याख्याते दु. मो. लोणे यांनी व्याख्यान दिले. ॲड. तेलगोटे, राज गोडबोले, कुमार कुर्तडीकर आदींची समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपासकांनी धम्मदान दिले. कुर्तडीकर आणि सहकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्रास साऊंड सिस्टीम भेट दिली. तिसऱ्या सत्रात उपासिका आरती वांगीकर परिवाराकडून उपस्थितांना भोजनदान देण्यात आले. चौथ्या सत्रात सुगाव येथील शाहीर प्रकाश लोकडे यांच्या भीमगीत गायन पार्टी संचाचा बुद्धभीमगीते गीतसंगित गायनवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन प्रा. रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार नागोराव नरवाडे यांनी मानले.