शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गावांना आत्मियतेने बघा, गावे बदलतील : उपायुक्‍त सुरेश बेदमुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ...

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डी. यू. इंगोले, एस. व्‍ही. शिंगणे, व्‍ही. आर. पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. लोकांचे परिवर्तन करून केलेले काम हे चिरकाल टिकणारे असते. या परिवर्तनातूनच गावाची ओळख निर्माण होत असते. त्‍यासाठी गावात मूलभूत सुविधांसह कायम स्‍वच्‍छतेचा उपक्रम हाती घेऊन लोकांचे आरोग्‍यमान उंचावावे. त्‍यासाठी नकारात्‍मक भावना बाजुला ठेवून कामे करावीत. माझा गाव सुंदर गाव ही संकल्‍पना साकारतांना गावातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत व इतर कार्यालयांची रंगरंगोटी करुन गावात नियमित स्‍वच्‍छता ठेवण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. याप्रसंगी बेथमुथा यांनी माझा गाव सुंदर गाव करण्‍यासाठी उपस्थितांना शपथ दिली. डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रास्‍ताविक केले. बालाजी नागमवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आभार मानले.

चौकट............

माझा गाव सुंदर गाव ही एक चळवळ झाली पाहिजे : वर्षा ठाकूर

माझा गाव सुंदर गाव हे अभियान स्‍वरुपात न राबविता ती एक चळवळ झाली पाहिजे. या चळवळीत लोकांचा सहभाग घेऊन नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबविल्यास गावात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतील, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. ग्रामसेवक हा ग्राम विकासाचा कणा असून, त्‍यांनी गावातल्‍या अडचणी समजून कामे करावीत. नाले सफाई, गाव स्‍वच्‍छता, शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनासह स्‍थानिक कार्यालयांची रंगरंगोटी करावी. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पूर्ण ठेवावे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.