शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये उमेदवारांची मोठी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन झाली आहे. या प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती ...

जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन झाली आहे. या प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅन करून अपलोड करणे व त्यानंतर ऑनलाइईन शुल्क भरून ऑनलाइईन भरलेला अर्ज, ऑनलाइईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मूळ दस्तावेज व त्याच्या छायांकित प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायती निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून जात पडताळणी कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दररोज साधारणपणे १ हजार प्रस्ताव दाखल होत आहेत. १६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सूरू झाली असून जात पडताळणी कार्यालयाच्या प्रांगणात उमेदवारांची एकच गर्दी दिसून येत आहे.व होताहेत दाखल.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रासाठी चार खिडक्या स्थापन केल्या असून यामध्ये एका खिडकीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. १६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल करण्यात असून दररोज ८००, ९०० प्रस्ताव दाखल होत आहेत. सध्या सर्व दाखल प्रस्तावांची छाननी करण्यात येत असून पुरूष व महिला अशी वर्गवारी केली जात आहे. - ए.एम. झंपलवार, कनिष्ठ लिपीक.

प्रशासनातर्फे दक्षता

समाज कल्याण विभागाअंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सॅनीटायझरची व्यवस्था केली असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. प्रस्ताव दाखल करण्यासाठी प्रांगणात रांग लावली जात आहे.

रोज १००० अर्ज

१६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल होत असून या दिवसी ४, १७ रोजी२२, १८ रोजी ५१, २१ रोजी १९३, २२ रोजी ४५२, २३ रोजी ७१०, २४ रोजी १०७९, २५ रोजी ६९३, २६ रोजी९४३, २७ रोजी १००० असे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षीत जागेवर उभा राहण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने सर्व प्रथम ऑनलाइईन प्रस्ताव दाखल करून त्याची प्रिंट व सर्व कागदपत्रे सोबत जाेडून प्रस्ताव दाखल केला आहे. यासाठी सकाळी लवकर येवून रांगेत उभे राहून प्रस्ताव दाखल केला. - गंगाधर साळवे.

विद्यार्थी

बारावी सायन्सचे विद्यार्थ्यांनी सध्या जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी कार्यालयात गर्दी केली असून दररोज २०० हून अधिक प्रस्ताव होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होणारी गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खिडकी स्थापन केली आहे. परिपूर्ण प्रस्ताव अर्जाचे प्रमाणपत्र महिनाभरात मिळत आहेत.