सर्व तिकिटे उपलब्ध
काही कारणास्तव ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेसमध्ये मॅन्युअल तिकीट दिले जात आहे; तर लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये मशीनद्वारे तिकीट फाडले जाते. नांदेड आगारात कागदी तिकिटांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- वर्षा येरेकर, आगारप्रमुख, नांदेड.
वाहकांची पुन्हा आकड्यांची जळवाजुळव
एस.टी.मध्ये काळानुसार बदल केले जात आहेत. यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांसह वातानुकूलित सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहिला आहे; परंतु कोणतीही योजना वा सुविधा दीर्घकाळ टिकत नसल्याने एस.टी.ची सेवा पुन्हा डबघाईस येत आहे.
मशीनद्वारे तिकिट देण्याची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाहकांचा आणि प्रवाशांचा वेळ वाचतो. त्याचबरोबर मशीनमुळे हिशेब जुळवाजुळवीसाठी वाहकांना जास्त डोके लावण्याची गरज नाही. परंतु मागील काही दिवसांपासून मशीनचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा मॅन्युअल तिकीट सुरू केले आहे. त्यामुळे वाहकांना पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
कर्मचाऱ्यांना पगार मिळतोय हेच नशीब !
कोरोनामुळे एस.टी. महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजही एस.टी.ला फारसा नफा मिळत नाही. डिझेल आणि कर्मचाऱ्यांचा खर्च निघण्याइतपत फेऱ्या होत आहेत. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचा पगार १५ ते २० दिवस उशिरा का होईना; परंतु त्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.