शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव येथे स्टेट बँकेच्या वतीने किसान दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील गणेश राऊत होते, तर प्रमुख पाहुणे शेख मूर्तुजा यांची उपस्थिती होती. बँक शाखा व्यवस्थापक नरवाडे, ...

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील गणेश राऊत होते, तर प्रमुख पाहुणे शेख मूर्तुजा यांची उपस्थिती होती. बँक शाखा व्यवस्थापक नरवाडे, गोल्ड योजनेचे जोंधळे, बचत गटाच्या सविता सातपुते, शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बँक अधिकारी संजय मामडे म्हणाले की, बँकेकडे देऊळगाव येथील शेतकऱ्यांचा व्यवहार चांगला आहे. शेतकरी कर्जवसुली असो किंवा इतर कामात बँकेला सहकार्य करतात, ज्या शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ झाले त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज पाहिजे त्यांनाही देऊ, ज्या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी कर्ज घेतले आहे आणि ते थकीत आहे, अशा कर्जदारांनी केवळ मुद्दल भरावी, व्याज माफ केले जाईल. सोन्यावर अगदी कमी व्याजावर कर्ज तात्काळ दिले जाईल. शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, शेती विकासासाठी बँकेकडे खूप योजना आहेत.

योजनेचा लाभ घ्यावा

बँकांची दारे सदैव खुली आहेत, असे मत बँक अधिकारी संजय मामडे यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी मारुती सोनवळे, बालाजी सोनवळे, अशोक पाटील, डी.एस. सोनवळे, कामाजी बंडेवार, गजानन सोनवळे, प्रल्हाद सोनवळे, नरहरी सोनकांबळे, गंगाप्रसाद सोनवळे, माधव सोनवळे, प्रकाश जोंधळे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.