शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

कंधार तालुक्यात अपु-या निधीमुळे पाणंदमुक्तीला खीळ; प्रशासन शौचालयांसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:58 IST

ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़

कंधार (नांदेड) : तालुका पाणंदमुक्तीसाठी शौचालय बांधकामे करण्याला निधीची आडकाठी आली़ त्यामुळे कामांना खीळ बसली़ अपुर्‍या निधीची कोंडी फोडण्यासाठी पाणंदमुक्तीला ग्रामपंचायत स्तरावरील निधीची मात्रा देऊन बांधकामातील अडथळा दूर करण्याचे सांगण्यात आले़ त्यातून १२ हजार ६२१ शौचालयाचे बांधकाम करून तालुका मार्च २०१८ अखेर पाणंदमुक्त होणार का? याची उत्सुकता लागली आहे़

तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने विविध टप्पे तयार केले़ स्वच्छतेची मोठी चळवळ निर्माण करण्यात यश आले़ ऐन दुष्काळ, सुगीच्या हंगामात शेतकरी-शेतमजुरांनी चळवळ गतिमान करण्यात सक्रिय योगदान दिले़ परंतु शौचालय बांधकाम करूनही निधीचा तुटवडा निर्माण झाला़ ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ परंतु निधीअभावी उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोठा गतिरोध निर्माण झाला़ दीड हजारांपेक्षा अधिक प्रस्ताव निधीची वाणवा झाल्याने रखडले़ त्यामुळे पाणंदमुक्तीचे भवितव्य अधांतरी झाले़ आणि ही चळवळ थंडावते की काय, असे चित्र निर्माण झाले़ तालुका स्तरावरून निधीची मागणी होवूनही पुरवठा मात्र होत नव्हता़ वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्नांची पराकाष्ठा होत होती़.मात्र आता निधीची कोंडी फोडण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे़ 

तालुक्यात ४० हजार ७९८ पैकी २८ हजार १७७ शौचालये बांधकाम पूर्ण झाली़ त्यात ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ अद्याप ६५ गावे ही पाणंदमुक्ते करण्यासाठी १२ हजार ६२१ शौचालयाची कामे पूर्ण करावी लागतील़ त्यात आता तळ्याचीवाडी ३२, बोरी खु़ ५५, शिरसी बु़ ५९, बोळका ६०, मानसिंगवाडी ६०, संगुचीवाडी ६५, दाताळा ६७, रामानाईकतांडा ७९, उमरगा खो़-८०, पोखर्णी ८४, धर्मापुरी मजरे ८५, दैठणा-९२, आलेगाव ९८, नारनाळी ९९, काटकळंबा १०१, औराळ १०३, शिरूर १०३, रुई १०६, पांगरा ११०, बोरी बु़ ११७, कंधारेवाडी ११७, हाडोळी ब्ऱ-११८, सावरगाव (नि़)-१२८, हटक्याळ १२९, शेकापूर १३१, शेल्लाळी १३१, बिजेवाडी १३६, उमरज १४३, येलूर १४५, तेलूर १५१, बामणी १५३, पानशेवडी १५६, कोटबाजार १५८, कळका १६२, लाडका १६४, हिप्परगा (श़)-१७०, गऊळ-२४३, दिग्रस खु़-१८७, नंदनवन १८७, शिराढोण १९१, दहीकळंबा १९२, मंगलसांगवी-२१८, कौठा-२२१, बाचोटी-२२३, घागरदरा-२२८, कल्हाळी २३२, खंडगाव (ह)-२५२, गुंटूर-२६३, फुलवळ-२६९, हाळदा २८२, वहाद-२८२, आंबुलगा-२८३, चिखली-२८७, मंगनाळी ३८२, पानभोसी-३९६, कुरुळा ५३६, उस्माननगर ५९७ व पेठवडज ९३२ अशी शौचालये बांधकामे आहेत़

१४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा निधीचा वापर होणारग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे़ १४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा, स्थानिक निधी आदींचा वापर कसा केला जाणार आहे आणि तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती कशा पाणंदमुक्त होणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ गावपातळीवरील लोकप्रतिनिधी यांचा प्रतिसाद, पं़स़चे नियोजन व पाठपुरावा यावरच तालुका पाणंदमुक्तीचे भवितव्य अवलंबून आहे़ 

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग शौचालय बांधकामासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत़ नरेगा, चौदावा वित्त आयोग, सीएसआर, स्थानिक निधी, लोकसहभाग आदी निधीचा वापर करण्याच्या सूचना जि़प़  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिका-यांना दिल्या आहेत.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNandedनांदेड