शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी जांभरूनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

मुदखेडच्या आठवडी बाजारात गर्दी मुदखेड - जिल्ह्यात आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले, तरी रविवारी २१ ...

मुदखेडच्या आठवडी बाजारात गर्दी

मुदखेड - जिल्ह्यात आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले, तरी रविवारी २१ रोजीचा मुदखेड येथील बाजार गर्दीने फुलून गेला होता. महसूल व पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. बाजारात पोलीस कर्मचारी होते. मात्र महसूल तथा पालिका कर्मचारी दिसले नाहीत.

ज्येष्ठांना बिस्किटे वाटप

नांदेड - भाजप महानगरच्यावतीने खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मार्च रोजी सुरेश टने यांच्यावतीने कोविड लस घेणाऱ्या ज्येष्ठांना बिस्कीट, मिनरल वॉटर, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी संयोजक ॲड. दिलीप ठाकूर उपस्थित होते.

१४ बोअरवेल मंजूर

लिंबगाव - नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी मतदारसंघात १४ बोअरवेल मंजूर केले आहेत. नांदेड शहरातील ब्रह्मसिंगनगर, हनुमान मंदिरच्या पाठीमागे एक बोअर मारून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संध्या कल्याणकर, भारत सरोदे, विठ्ठल शेट्टी, वानखेडे आदी उपस्थित हाेते.

फळबागांना फटका

हदगाव - तालुक्यातील बरडशेवाळा, बामणीफाटा, पळसा, मनाठासह परिसरातील गावातील फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले. मनाठा येथील शेतकरी श्रीराम राठोड, गंगासागर पाटील यांनी दोन एकर जमिनीत पपईची लागवड केली होती. मात्र त्यांची मेहनत वादळी वाऱ्याने वाया घालवली.

बारडकर यांना श्रद्धांजली

मुदखेड - नांदेड जि. प. चे माजी अध्यक्ष शंकरराव बारडकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन, सचिव रामेश्वर कोनबनवाड, सहसचिव अशोक गव्हाणे, पंडितराव भोसले, मुख्याध्यापक रामकिशन चुबेवार, प्रा. नारायण सावंत, प्रा. कैलास खानसोळे, प्रा. कैलास कपाटे, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

पोलिसांनी पकडली दारू

लोहा - तालुक्यातील शंभरगाव येथे पोलिसांनी तीन पेट्या दारू जप्त केली. आरोपीलाही अटक केली. २० मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकात पोलीस नायक रामेश्वर जायभाये, नीळकंठ श्रीमंगले, शिवपुजे, महाबळे आदी सहभागी होते.

अवैध वाळूचा उपसा सुरूच

किनवट - किनवट तालुक्यातील रामपूर, भामपूर, पाथरी, अंबाळा, पार्डी, दुर्गापेठ गावालगत पैनगंगा नदी वाहते. या नदीपात्रात वाळूसाठा भरपूर असल्याने वाळू तस्करांची दरवर्षी नजर या पात्रावर असते. महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळू तस्कर पुरेपूर फायदा घेत आहेत.

स्मार्ट कार्डची नोंदणी

हदगाव - दिव्यांग व्यक्तींना एसटी बस प्रवास सवलतीसाठी हदगाव आगारात दिव्यांग स्मार्ट कार्ड नोंदणीची सुुरुवात झाली. दिव्यांग लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी हदगाव आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.

शॉर्टसर्किटने उसाला आग

मुदखेड- वाडीनियमतुलापूर येथे शेत गट क्र.११४ मधील बापूराव खानसोळे यांचा ऊस शॉर्टसर्किटने जळाला. ही घटना १९ मार्च रोजी घडली. तीन एकर क्षेत्रातील उसाचे यात नुकसान झाले. संबंधित शेतकऱ्याने एका निवेदनाद्वारे ही माहिती पोलीस ठाण्यास दिली. महावितरणने शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

विषारी औषध पिऊन तरुणाची आत्महत्या

भाेकर - भोकर तालुक्यातील ताटकळवाडी येथील चांदोबा तुकाराम वागदकर (वय २२) याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी नांदेडला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण कळले नाही. भोकर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.

जागतिक वनदिन साजरा

किनवट - पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करून वनविभागाने जागतिक वनदिन साजरा केला. मांडवी परीक्षेत्रांतर्गत यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी दुर्गेश शेरेकर, पळशीचे सरपंच, वनपाल माने, वनरक्षक रायमले, करिश्मा ढाके, ज्योती इजळे उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले.