शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

उद्योजकता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

उद्योग संचालनालयाच्या वतीने सन १९८४ पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सूक्ष्म व लघु ...

उद्योग संचालनालयाच्या वतीने सन १९८४ पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन २००६ पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे १५ हजार व १० हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

यात्रांसाठी परवानगी देण्याची मागणी

नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातील यात्रा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय आंबेडकर महासभेच्या वतीने करण्यात आली आहे. यात्रा बंद असल्याने अनेक लहान व्यापारी, फेरीवाले यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यात्रा सुरू कराव्यात, अशी मागणी श्रावण नरवाडे, दीक्षा नरवाडे आदींनी केली.

स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करा

नांदेड : शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १११ येथे गरजू व सामान्यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. या दुकानाची चाैकशीही करण्यात आली होती.

बांधकाम कामगारांचे प्रस्ताव

देड : बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी संघाने केली आहे. बांधकाम कामगारांचे अनेक प्रस्ताव निकाली न काढता त्यात त्रुटी दाखविल्या जात आहेत. बांधकाम कामगारांचे अनुदानित प्रस्ताव २०१७ पासून मंजूर करण्यात आले नाहीत. प्रस्ताव निकाली न निघाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

शिष्यवृत्ती रखडली

नांदेड : पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीची रक्कम देण्याची मागणी भाजप विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०१८-१९ व २०१९-२० या वर्षातील रक्कम अजूनही देण्यात आली नाही. याबाबत निवेदन देण्यात आले.

संजीवन समाधी सोहळा

नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगाधर भायेगावकर यांच्यासह गावकऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

स्मशानभूमीच्या विकासाची मागणी

नांदेड : वसरणी येथील नावघाट स्मशानभूमीचा विकास करण्याची मागणी स्थायी समिती सदस्या दीपाली संतोष मोरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. गोदावरीकाठी वसरणी येथील नावघाट स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी दीपाली मोरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.